Marathi News> मनोरंजन
Advertisement

'हम साथ साथ है'... घटस्फोटानंतरही धनुष-ऐश्वर्या राहतायेत एकत्र?

 साऊथ सुपस्टार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत वेगळे झाले आहेत मात्र...

'हम साथ साथ है'... घटस्फोटानंतरही धनुष-ऐश्वर्या राहतायेत एकत्र?

मुंबई : साऊथ सुपस्टार धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत वेगळे झाले आहेत. तेव्हापासून दोघंही हैद्राबादमध्ये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुष आणि ऐश्वर्या हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये एकत्र राहत आहेत. या कपलने त्यांच्या लग्नाच्या 18 वर्षानंतर वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका पोस्टमध्ये शेअर केली आहे.

सितारा हॉटेलमध्ये थांबले आहेत धनुष-ऐश्वर्या
एका वृत्तानुसार, धनुष आणि ऐश्वर्या हैदराबादच्या रामोजी राव स्टुडिओमधील स्टार हॉटेलमध्ये राहत आहेत. या स्टुडिओत शूटिंग करणारे स्टार्स सितारा हॉटेल्समध्ये मुक्काम करतात. इथे हे दोघंही त्यांच्या वेगळ्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. धनुष त्याच्या आगामी एका चित्रपटावर काम करत आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या टिप्स आणि प्रेरणा अरोरा यांच्यासाठी एक लव्हसॉन्ग दिग्दर्शित करण्याच्या तयारीत आहे. ज्याचं शूटिंग रामोजी राव स्टुडिओमध्ये २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे गाणं व्हॅलेंटाईन वीकमध्ये रिलीज होणार आहे.

fallbacks

धनुष-ऐश्वर्याचं स्टेटमेंट
घटस्फोटाबद्दल जोडप्याने सोशल मीडियावर लिहिलं, आम्ही एकमेकांटे मित्र, कपल, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून 18 वर्षांपर्यंत, समजूतदारपणा आणि भागीदारीचा मोठा पल्ला गाठला आहे. आज आम्ही जिथे उभे आहोत तिथून आपचे मार्ग वेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी कपल म्हणून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करा.

Read More