Marathi News> मनोरंजन
Advertisement

धनुष- ऐश्वर्याचा घटस्फोट म्हणजे....; अभिनेत्याच्या वडिलांकडून धक्कादायक खुलासा

या दोघांनीही आपण 18 वर्षांचा संसार मोडत असल्याचं सांगितलं. 

धनुष- ऐश्वर्याचा घटस्फोट म्हणजे....; अभिनेत्याच्या वडिलांकडून धक्कादायक खुलासा

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता धनुष यानं त्याची पत्नी, ऐश्वर्या रजनीकांत हिच्यासोबतचं आपलं वैवाहिक नातं संपुष्टात आल्याटी माहिती जाहीर केली. एका पत्रकाच्या माध्यमातून धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनीही आपण 18 वर्षांचा संसार मोडत असल्याचं सांगितलं. dhanush dIvorce) 

18 वर्षांच्या सहवासानंतर, पालक म्हणून एकत्र आयुष्य जगल्यानंतर आता वाटा वेगळ्या झाल्याचं त्यांनी आपआपल्या पोस्टमधून म्हटलं. 

अतिशय अनपेक्षितपणे या जोडप्याने विभक्त होण्याचा त्यांचा निर्णय सांगितला. ज्यानंतर अनेकांनाच हादरा बसला. 

धनुष आणि ऐश्वर्या नेमके का वेगळे झाले, यामागचं कारण काय असे अनेक प्रश्न यानंतर उपस्थित करण्यात आले. 

आता म्हणे धनुषच्या वडिलांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळं कौटुंबीक मतभेदांतून त्यांनी हा निर्णय घेतला असून, हे क्षणिक आहे असे संकेत दिले. 

कस्तुरी राजा यांच्या मते, या जोडीमध्ये झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

सहसा वैवाहिक जोडप्यांमध्ये होणाऱ्या कौटुंबीक वादांचाच त्यांनी यावेळी संदर्भ दिला. 

'धनुष आणि ऐश्वर्या हे दोघंही सध्या चेन्नईत नाहीत. ते हैदराबादमध्ये आहेत. मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना काही सल्ले दिले', असं ते म्हणाले. 

आताच्या घडीला वेगळं होऊ स्वत:ला समजून घेण्याची वेळ आल्याचं या दोघांनीही सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं. ज्यामुळे खरंच त्यांच्या एकत्र येण्याची काही चिन्हं आहेत का, असाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे. 

दरम्यान, सध्या तरी या जोडीनं विनंती केल्यानुसार त्यांच्या या निर्णयाचा आणि गोपनीयतेचा मान राखत गोष्टी आणि परिस्थिती स्थिरस्थावर होण्याचीच सारे वाट पाहत आहेत. 

Read More