Marathi News> मनोरंजन
Advertisement

धनुष आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाला सारा अली खान जबाबदार? दोघांना 'असं' पाहून नेटकरी म्हणाले...

 आजकाल बॉलीवूड सेलिब्रेटी हे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. 

धनुष आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाला सारा अली खान जबाबदार?  दोघांना 'असं' पाहून नेटकरी म्हणाले...

Sara ali khan : आजकाल बॉलीवूड सेलिब्रेटी हे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्याच्या प्रोफेशनल ते पर्सनल आयुष्यापर्यंतच्या अनेक गोष्टी या सोशल मीडियावरून व्हायरल होत असतात आणि त्यावर नेटकरी त्यांची प्रशंसा तरी करतात नाहीतर त्यांचे ट्रोेलिंग. सध्या अभिनेत्री सारा अली खान या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. नुकतीच ती एका पार्टीमध्ये दिसली. जेव्हा ती फोटोसाठी मीडियासमोर आली तेव्हा ती एकटीच नव्हती तर तिच्यासोबत साऊथ इंडियन अभिनेता तसंच रजनीकांतचा पुर्वीचा जावई धनुष होता. त्याच्यासोबत ती स्पॉट झाली. ते एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते आणि हेच पाहून ट्रोलर्स दोघांवरही भडकले. 

यापुर्वीही धनुष आणि सारा अली खान चांगलेच चर्चेत आले होते. वर्षभरापुर्वी त्यांचा 'अतरंगी रे' हा चित्रपट रिलीज झाला होता. तेव्हापासून अनेक दिवस ते कुठेही एकत्र स्पॉट झाले की एकमेकांच्या खांद्यावर हात किंवा हातात हात घालून उभे राहून फोटोसाठी पॉझ द्यायचे त्यामुळे त्यांना अशाप्रकारे पाहून त्यांच्या चाहतेही चांगलेच भडकले आणि दोघेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले. 

अभिनेता धनुष याचा काही वर्षांपुर्वी पत्नी ऐश्वर्यासोबत घटस्फोट झाला आहे. ऐश्वर्या ही साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. त्यांचा घटस्फोट झाल्यामुळे सारा अली खानला अशाप्रकारे सतत धनुषसोबत पाहून चाहत्यांनी दोघांवर टीका केली आणि त्यातून सर्वात जास्त टीका ही धनुषपेक्षा सारा अली खानवर होऊ लागली. सारा अली खानला असं सतत धनुषसोबत चाहते पाहू लागल्याने साराच धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाला कारणीभूत आहे अशी टीका तिच्यावर झाली. आता पुन्हा एकदा त्यांचा हा फोटो पाहून नेटकरी पुन्हा एकदा भडकले आहेत. 

सारा अली खान ही सैफ अली खानची मुलगी आहे, ती चार वर्षींपुर्वी बॉलीवूडमध्ये डेब्यू केले आहे. तिचं फॅन फोलोईंग खूप मोठं आहे. सारा अली खान नुकतीच 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या शोमध्ये आली होती. धनुष हाही साऊथचा लोकप्रिय कलाकार असून त्याने बॉलीवूडमध्ये काम केले आहे. त्याचे 'कोलावरी डी' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले होते. 

Read More