Marathi News> मनोरंजन
Advertisement

रजनीकांत यांच्या मुलीपासून विभक्त झालेला धनुष खास व्यक्तीसोबत गेला सुट्टीवर

धनुष एका खास व्यक्तीसोबत तितक्याच खास सफरीवर गेला आहे. 
 
 

रजनीकांत यांच्या मुलीपासून विभक्त झालेला धनुष खास व्यक्तीसोबत गेला सुट्टीवर

मुंबई : दाक्षिणात्य कलाजगत गाजवणाऱ्या अभिनेता धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी, रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी त्यांच्या वैवाहिक नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. वैवाहिक नात्यात आलेला दुरावा या दोघांसाठीही तितकासा सोपा नव्हता. पण, तरीही त्यांनी नात्यात आलेलं हे वळण स्वीकारलं. (Dhanush Aishwarya)

एकिकडे खुद्द रजनीकांत त्यांच्या मुलीच्या आणि जावयाच्या नात्यात आलेला दुरावा मिटवण्याचे प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे धनुष मात्र सध्या या गुंतागुंतीपासून दूर गेला आहे. 

विभक्त झाल्यानंतर  आपआपल्या कामांमध्ये हे दोघंही खरंतर व्यग्र झाले. ज्यामध्येच धनुष एका खास व्यक्तीसोबत तितक्याच खास सफरीवर गेला आहे. 

ही खास व्यक्ती कोण, तुम्हालाही पडला ना प्रश्न? ....तर, धनुषसोबत असणारी ही खास व्यक्ती दुसरंतिसरं कोणी नसून तो त्याचा मुलगा यत्र (Yathra) आहे. 

पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर धनुषची ही पहिली पोस्ट ठरत आहे. यामध्ये त्याचं मुलासोबत असणारं नातं अगदी स्पष्टपणे दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

धनुष सध्या त्याच्या मुलाला वेळ देताना दिसत आहे. यत्रसोबत तो कोणा खास ठिकाणी गेला आहे. जिथे सुंदर डोंगररांगा आणि तितकाच सुरेख निसर्ग मन मोहून जात आहे. 

चाहत्यांनाही ही बाप- लेकाची बॉण्डिंग चांगलीच भावली आहे, तुम्ही पाहिली का हा फोटो ? 

Read More