Marathi News> मनोरंजन
Advertisement

आजारपणाची चर्चा सुरू असतानाच धर्मेंद्र यांच्या तब्येतीवर मोठी अपडेट, स्वतःच केला खुलासा

Dharmendra in USA: सध्या धर्मेंद्र यांची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगलेली आहे. त्यांच्या या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे कारण ते उपचारांसाठी अमेरिकेला पोहचले आहेत अशी माहिती कळते आहे परंतु त्यांनीच याबाबत खुलासा केला आहे. 

आजारपणाची चर्चा सुरू असतानाच धर्मेंद्र यांच्या तब्येतीवर मोठी अपडेट, स्वतःच केला खुलासा

Dharmendra in USA: सध्या चर्चा आहे ती म्हणजे धर्मेंद्र यांची. ते अमेरिकेला उपचारांसाठी गेले आहेत, अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते हे काळजीत पडले आहेत. परंतु काल रात्री धर्मेंद्र यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यानं वेगळीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे चाहत्यांची त्यांच्याकडेच चर्चा रंगलेली आहे. यावेळी धर्मेंद्र यांनी लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. काही दिवसांपुर्वी धर्मेंद्र हे पुन्हा चर्चेत आले होते. सनी देओलचा गदर 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे सनी देओलची चांगलीच चर्चा होती. सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटानं संपुर्णपणे 'गदर' केला आहे.

आपल्या लेकाच्या कौतुकात धर्मेंद्रही दंग झाले होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. 'गदर'च्या यशावरून हे स्पष्ट दिसते की सनी देओलही कशातच कमी नाही. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सक्सेस पार्टीलाही त्यांनी हजेरी लावली होती. 

यावेळी सध्या सनी देओल यांच्या आजारपणाची चर्चा सुरू झाली आहे त्यातून ते अमेरिकेला उपचारांसाठी पोहचले आहेत. परंतु यावरून खुद्द धर्मंद्र यांनी खुलासा केला असून यावर इंडिया टीवीला दिलेल्या मुलाखतीत सनी देओल म्हणाले की धर्मेंद्र हे काही अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले नसून ते आपल्या वडिलांसोबत सुट्टीवर गेले आहेत. ते सध्या कॅलफॉर्नियामध्ये आहेत आणि आपल्या परिवारासोबत सुट्टी एन्जॉय करत आहेत. त्यातून यावेळी धर्मेंद्र यांनी ट्विटरवरही आपल्या या वेकेशनबद्दल अपडेट दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना चांगलंच उधाण आलं आहेत. यावेळी जे ट्विट धर्मेंद्र यांनी शेअर केले आहेत. तिथे ते आपल्या सुट्ट्या या मस्त एन्जॉय करत आहेत. त्यामुळे त्यांचा फोटोही व्हायरल झाला आहे. 

यावेळी त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ते रिलॅक्स दिसत आहेत आणि त्यांच्या कडेवर एक क्युट डॉगीही आहे आणि फोटोत ते मस्त स्माईल करत पोझ देत आहेत. यावेळी त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, ''मित्रांनो, खूप दिवसांनी मी एका छोट्या सुट्टीवर गेलो आहे. सध्या मी युएसमध्ये आहे. माझ्या नव्या चित्रपटासाठी मी परत येणार आहे. हा कुत्रा माझ्याही प्रेमात पडला आहे.'' असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. यावेळी हे स्पष्ट होते की ते ठीक आहे आणि आनंदी आहेत. त्यांच्या या पोस्टखालीही नानाविध कमेंट्स येयला सुरूवात झाली आहे. 

Read More