Marathi News> मनोरंजन
Advertisement

जेव्हा ईशा देओलसाठी धर्मेंद्रंच्या पहिल्या पत्नी शोधत होत्या वर; तरी लग्नात पोहोचल्या नाही...

Dharmendra's First Wife Esha Deol : धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर जेव्हा ईशा देओलसाठी शोधत होत्या वर... 

जेव्हा ईशा देओलसाठी धर्मेंद्रंच्या पहिल्या पत्नी शोधत होत्या वर; तरी लग्नात पोहोचल्या नाही...

Dharmendra's First Wife Esha Deol : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी जेव्हा हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं तेव्हा ते आधीच विवाहित होते. त्यांना चार मुलं देखील होती. त्यांचं पहिलं लग्न हे पंजाबमध्ये राहत असतानाच प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. त्यावेळी ते मुंबईत आले नव्हते आणि त्यांनी अभिनेता बनायचं स्वप्न देखील पाहिलं नव्हतं. खरंतर जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा त्यांचा मोठा मुलगा अर्थात सनी देओलचा जन्म झाला होता. 

सनी, बॉबी, अजिता आणि विजयता ही चार मुलं झाल्यानंतरही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. मात्र, त्यांनी कधीही प्रकाश कौर यांना घटस्फोट दिला नाही. धर्मेंद्र यांच्या या दोन कुटुंबांमधील संबंधांबद्दल अनेक वर्षांपासून चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू असतात. पण सगळ्या मतभेदांनंतरही, या कुटुंबांतील लोक एकमेकांविषयी आदर आणि चांगली भावना ठेवतात.

राजीव विजयकर यांनी लिहिलेल्या 'धर्मेंद्र: नॉट जस्ट ए ही-मॅन' या पुस्तकात, त्यांनी धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांची भेट घेतल्याचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले, 'त्या एक सुंदर आणि समाधानी स्त्री होत्या. जरी ही भेट थोड्याच वेळासाठी होती, तरी त्या एक असामान्य गृहिणी होत्या ज्यांनी धर्मेंद्र यांच्या यशात मोलाचं योगदान दिलं.'

प्रकाश कौर ईशासाठी वर शोधत होत्या

प्रकाश कौर फक्त त्यांच्या स्वतःच्या मुलांचीच काळजी घेत नव्हत्या, तर हेमा मालिनीच्या मुलांची ईशा आणि अहानाची देखील चिंता करायच्या. एवढंच नव्हे, तर 2012 मध्ये जेव्हा ईशा देओलचं भरत तख्तानीसोबत लग्न ठरलं, तेव्हा तिच्यासाठी वर शोधण्याचा प्रयत्न प्रकाश यांनीही केला होता. राजीव यांनी पुढे लिहिलं की, 'धर्मेंद्र यांनी स्वतः एकदा सांगितलं होतं. प्रकाशदेखील ईशासाठी चांगला वर शोधते आहे.'

त्या पुस्तकात आणखी एक किस्सा आहे. पत्रकार भारती एस. प्रधान यांनी सांगितलं की, एकदा त्यांनी प्रकाश कौर यांना विमानतळावर पाहिलं. पण त्यांच्याशी बोलण्यासाठी पुढे गेल्यावर प्रकाश अचानक नजरेआड झाल्या. 

ईशाच्या लग्नाला प्रकाश कौर उपस्थित नव्हत्या

काही कारणामुळे प्रकाश या ईशासाठी योग्य वर शोधू शकल्या नाही. ईशाच्या लग्नात प्रकाश यांच्या कुटुंबातील कोणीही सहभागी झालं नाही. तर 2023 मध्ये जेव्हा सनी देओलचा मुलगा करण देओलचं लग्न झालं, तेव्हा हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलीही त्या लग्नात नव्हत्या. हे या कुटुंबातील जुनी परंपरा आहे. ईशा देओलचं भरत तख्तानीसोबत 2012 मध्ये लग्न झालं. 12 वर्षानंतर ते विभक्त झाले. 

जेव्हा ईशा सावत्र आईच्या घरी गेली...

ईशा देओलनं एकदा सांगितलं होतं की, ती एकदा प्रकाश कौर यांना भेटली जेव्हा ती आपल्या आजारी असलेले काका (धर्मेंद्र यांचे भाऊ) यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेली होती. तेव्हा ती प्रकाश यांना भेटली आणि प्रकाश यांनीही तिला प्रेमानं आशीर्वाद दिला. हे किस्से तिने 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या पुस्तकात शेअर केले आहेत. तिने हेही सांगितलं की, 'चौथीत असताना मला समजलं की माझ्या आईनं ज्यांच्याशी लग्न केलं आहे, त्यांचे आधीपासूनच एक कुटुंब आहे. पण खरं सांगायचं तर मला ते कधीच विचित्र वाटलं नाही. माझ्या आई-वडिलांनी आम्हाला कधीच वेगळं वाटू दिलं नाही.'

हेमा मालिनीही करतात प्रकाश कौर यांचा सन्मान

हेमा मालिनी यांनीही त्यांच्या पुस्तकात प्रकाश कौर यांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'मी त्यांना कधीच भेटले नाही, पण मी त्यांचा खूप सन्मान करते. माझ्या मुलीही धरमजींच्या कुटुंबाचा सन्मान करतात. लोकांना माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप जाणून घ्यायचं असतं, पण काही गोष्टी सगळ्यांना माहीत असाव्यात असं नाही.'

Read More