Guess This Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये दररोज नवे चेहरे येतात, पण प्रत्येकालाच संधी मिळतेच असे नाही. मात्र काही चेहरे मेहनतीने आपले वेगळे स्थान निर्माण करतात. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जिने अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे.
आज 13 जून रोजी दिशा पटानी आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिला इंडस्ट्रीमधील अनेक नामांकित कलाकारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बरेलीची रहिवासी असलेली दिशा पटानी अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने लखनऊमधील अॅमिटी युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले होते. मात्र, शिक्षणादरम्यानच अभिनयाची आवड निर्माण झाले आणि त्यामुळेचं तिने अभ्यास सोडून थेट मुंबईला यायचे ठरवले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईला आल्यानंतर दिशाकडे फक्त 500 रुपये होते. शहरात राहणं, खाणं आणि विशेषतः घराचे भाडे भरणे हे सगळं तिला खूप कठीण वाटत होतं. पण परिस्थिती कितीही कठीण असली तरी दिशाने हार मानली नाही आणि सतत प्रयत्न करत राहिली. तिलने तिच्या अभिनयाच्या स्वप्नीसाठी अत्यंत कष्ट केले आणि तिच्या या चिकाटीला यश मिळाले. 2015 मध्ये पुरी जगन्नाथ यांच्या 'लोफर' या तेलुगू चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात ती वरुण तेजसोबत झळकली होती. जरी हा चित्रपट फारसा चालला नाही, तरी दिशासाठी तो एक मोठी संधी ठरला.
यानंतर दिशाने बॉलिवूडमध्ये यायचे ठरवले. 'एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या चित्रपटात तिने महेंद्रसिंग धोनीच्या प्रेयसीची भूमिका साकारली. या चित्रपटात तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यासोबत काम केले आणि इथूनच ती लोकांच्या नजरेत आली.
दिशा पटानी अभिनयापेक्षा अधिक तिच्या सौंदर्य, फिटनेस, डान्स आणि अॅक्शनसाठी ओळखली जाते. फार थोड्यांना माहीत असेल की दिशा मार्शल आर्ट्स आणि जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेतले आहे. दिशा पटानीचे नाव बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडले गेले होते. त्या दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना खुप आवडली. टायगर आणि दिशा अनेकदा सहलीला, पार्टीमध्ये एकत्र दिसायचे त्यामुळे अनेक अफवा पसरु लागल्या होत्या. मात्र, त्यादोघांनी कधीही या अफवांवर उत्तर दिले नाही.
आज दिशा पटानी बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते आणि ती एक आलिशान जीवनशैली जगत आहे. अभियांत्रिकीमधून बॉलिवूडपर्यंतचा तिचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.