Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयाच्या चौथ्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं जे पाहिलं ते कोणाच्याही नशिबी येऊ नये...

ती निर्मिती क्षेत्रातही बरीच सक्रिय आहे.   

वयाच्या चौथ्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं जे पाहिलं ते कोणाच्याही नशिबी येऊ नये...

मुंबई : कलाकारांच्या वाट्याला आलेलं यश आणि त्यांची श्रीमंती पाहून चाहत्यांना कायमच त्यांचा हेवा वाटत असतो. पण, काही कलाकार मात्र या टप्प्यावर पोहोचेपर्यंत अशा वळणांतून पुढे आलेले असतात जे पाहता त्यांच्यावर आलेली वेळ इतर कोणावरही येऊ असंच वाटतं. 

'रहना है तेरे दिल में' या चित्रपटातून झळकलेल्या आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झा हिनंही अशा परिस्थीतीचा सामना केला होता. 

वयाच्या चाळीसाव्या वळणावर असणारी दिया पर्यावरणप्रेमी आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच ती निर्मिती क्षेत्रातही बरीच सक्रिय आहे. 

दियाकडे पाहिल्यानंतर आनंदाची एक वेगळीच अनुभूती होते. पण, तुम्हाला ठाऊक आहे का, याच दियानं वयाच्या अवघ्या चौथ्याच वर्षी एका मोठ्या घटनेला तोंड दिलं. 

ही घटना होती, आई- वडिलांचं विभक्त होणं. फ्रँक हँड्रिच असं दियाच्या वडिलांचं नाव. पण, ती फार लहान असतानाच तिच्या आई- वडिलांच्या नात्याला तडा गेला. 

हे नातं तुटल्यानंतर दियाच्या आईनं अहमद मिर्झा यांच्याशी लग्न केलं. ९ वर्षांची असताना दियाचे खरे वडील निधन पावले. तर, ती 23 वर्षांची असताना सावत्र वडिलांचंही निधन झालं. 

मिर्झा हे अतिशय चांगल्या मनाचे व्यक्ती होते. त्यांनी आपल्याला अनेक चांगल्या गोष्टींची शिकवण दिली असं दियानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

दियाच्या खासगी आयुष्यातील वादळ तिथंच थांबलं नव्हतं. पहिल्या लग्नात खुद्द दियाही अपयशी ठरली. ज्यानंतर तिनं 2021 मध्ये वैभव रेखी याच्याशी दुसरं लग्न केलं. सध्या दिया तिच्या कौटुंबीक जीवनात चांगलीच रुळली आहे.  

Read More