Marathi News> मनोरंजन
Advertisement

Dia Mirza Delivery : दियाने Premature बाळाला दिला जन्म, शेअर केला पहिला फोटो

Premature बाळाचं गोंडस नाव केलं शेअर 

Dia Mirza Delivery : दियाने Premature बाळाला दिला जन्म, शेअर केला पहिला फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने प्रीमॅच्युअर बाळाला दिला जन्म. अभिनेत्री दिया आणि पती वैभव रेखीने सोशल मीडियावर आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. महत्वाचं म्हणजे या दोघांनी बाळाचं नाव आणि त्याचा पहिला फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ( Dia Mirza,  Mother, Shares, First Picture, Premature Baby, C-Section) 

दियाने दिलेल्या माहितीनुसार, मुलाचा जन्म 14 मे रोजी दिलेल्या वेळेच्या अगोदर झाला. बाळाला NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. जवळपास दोन महिन्यांनतर दियाने ही गोड बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, गरोदरपणात तिला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं होतं. त्यावेळी तिची तब्बेत खूप खालावली होती. अशावेळी तात्काळ C-Section द्वारे बाळाचा जन्म झाला. ड्यू डेटच्या अगोदर बाळाचा जन्म झाल्यामुळे त्याला NICU मध्ये ठेवण्यात आलं. 

दिया आणि वैभव आपल्या बाळाचं घरी स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे आजी-आजोबा आणि बहिण समायरा बाळाला घेण्यासाठी उत्सुक आहेत. दियाने बाळाच्या फोटोसोबतच त्याचं नाव देखील जाहीर केलं आहे. अवयान आझाद रेखी (Avyaan Azaad Rekhi) असं नाव ठेवलं आहे. 

Read More