डिजिटल प्रीमियरच्या सहा वर्षांनंतर दिग्दर्शक सोनम नायर यांच्या 'काफिर' या मालिकेची पुनर्कल्पना एका फिचर फिल्मच्या रूपात करण्यात आली आहे. यामुळे भावनिकदृष्ट्या भरलेल्या या कथेला नव्याने जीवनदान मिळालं आहे. मूळतः स्ट्रीमिंग मालिकेच्या रूपात प्रदर्शित झालेली 'काफिर' ही मालिका कैनाज अख्तर या पाकिस्तानी महिलेभोवती फिरते, जी चुकून भारतीय हद्दीत घुसते आणि नंतर दहशतवादी असल्याच्या संशयाखाली तुरुंगात कैद केली जाते.
दिया मिर्झाने साकारलेल्या कैनाजच्या या कहाणीचा प्रवास प्रेक्षकांना खूप भावला होता. विशेषतः या मालिकेतील थीम, कठीण क्षण आणि दियाने साकारलेली सुंदर भूमिका प्रेक्षकांना आवडलं होतं. मालिकेतून चित्रपटातील कथेच रूपांतर झाल्यामुळे दियाला तिच्या पात्राची भावनिक खोली समजून घेण्याची आणखी एक संधी मिळाली. दरम्यान अभिनेत्रीने अलीकडेच एका विशिष्ट दृश्याने तिच्यावर झालेल्या शारीरिक आणि मानसिक परिणाम केल्याचा खुलासा केला.
"मला आठवतं जेव्हा आम्ही बलात्काराचा सीन शूट केला तेव्हा तो फारच कठीण होते. तो सीन शूट झाल्यानंतर मी अक्षरश: थरथरत होते. मला आठवतं की, मी उलटी केली होती. संपूर्ण सिक्वेन्स शूट झाल्यानंतर मी उलट्या केल्या होत्या. ती परिस्थितीच भावनिक आणि शारिरीकरित्या तशी होती. जेव्हा तुम्ही संपूर्ण शरिरासह त्या क्षणाच्या सत्यात नेता तेव्हा असंच होतं. तुम्हाला ते पूर्ण प्रमाणात जाणवतं," असं दिया मिर्झाने सांगितलं.
वास्तविक जीवनात आई होण्याच्या खूप आधीपासून या अनुभवामुळे मातृत्वाची भावना निर्माण झाली असंही तिने सांगितलं. "मला वाटतं की एक कलाकार म्हणून तुम्ही ज्या पात्राची भूमिका साकारत आहात त्याबद्दल सहानुभूती असणं आवश्यक असलेली पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जेणेकरून तुम्ही ती भूमिका निभावता तेव्हा तुम्ही कथेशी आणि त्यातील प्रत्येक गोष्टीशी पूर्णपणे प्रामाणिक असता. कैनाजची भूमिका साकारल्याने मी खरी आई होण्याच्या खूप आधीपासून आई झाले. शोमध्ये काम करताना मला तिच्याबद्दल वाटणारी तीव्रता, क्रूरता, प्रेम आणि संरक्षण यामुळेच हे घडले," असं ती पुढे म्हणाली.
भवानी अय्यर लिखित काफिर हा चित्रपट कैनाज अख्तरची कहाणी सांगितलं, जिला चुकीच्या पद्धतीने दहशतवादी म्हणून तुरुंगात टाकण्यात आलं आहे. IMDb वरील माहितीनुसार, "पत्रकार वेदांत तिला आणि तिच्या मुलीला शोधतो, जिचा जन्म तुरुंगात झाला होता. न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने प्रेरित होऊन, तो सत्य उलगडण्याच्या मोहिमेवर निघतो". काफिरची चित्रपट आवृत्ती आता ZEE5 वर उपलब्ध आहे.