Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणबीर- आलियाच्या लेकिनं लावलेले हेअर क्लिप कुठं मिळतात? खरंच ते चाहत्यानं Gift दिले होते?

Ranbir Kapoor Alia Bhatt`s Daughter Raha : नुकत्याच ख्रिसमसच्या निमित्तानं आयोजित लंच पार्टीदरम्यान रणबीर- आलियानं लेकिला सर्वांसमोर आणलं.   

रणबीर- आलियाच्या लेकिनं लावलेले हेअर क्लिप कुठं मिळतात? खरंच ते चाहत्यानं Gift दिले होते?

Ranbir Kapoor Alia Bhatt`s Daughter Raha : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी नुकतंच त्यांच्या मुलीला, म्हणजेच राहा कपूरला माध्यमांच्या समोर आणलं. जन्मापासून आतापर्यंत त्यांनी कोणीच सोशल मीडियावर तिचा एकही चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो शेअर केला नव्हता. पण, आता मात्र राहाचा चेहरा सर्वांसमोर अतिशय सुरेखरित्या आला आणि अनेकांचीच नजर तिच्यावर खिळली. निळसर डोळे, नितळ कांती अशा रुपात ही इवलिशी राहा सर्वांच्याच मनात घर करून गेली. 

राहाला ख्रिसमसच्या निमित्तानं घालण्यात आलेले कपडे, छानसा फ्रॉक, लाल रंगाचे छोटेसे बुट आणि इवलेसे पोनी, त्यावर असणारे फुलांच्या आकाराचे फिकट गुलाबी रंगाचे क्लिप हे सारं सारंकाही फारच Cute होतं अशीच प्रतिक्रिया चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी दिली. 

मुख्य म्हणजे अशीची चर्चा रंगली, की राहाला लावलेले हेअरक्लिप हे रणबीरच्याच एका चाहत्यांनं भेट स्वरुपात दिले होते. RK 82 नावाच्या X अकाऊंटवरून राहाचे फोटो पोस्ट करण्यात आले आणि त्याच्या कॅप्शनमध्ये अशी माहिती देण्यात आली, जी पाहून बरेचजण थक्क झाले. 

हेसुद्धा पाहा : हनिमूनसाठी परदेशात जायचंय? पाहा परवडणाऱ्या ठिकाणांची यादी 

'कमाल... बेबी राहानं मी भेट दिलेले हेअर क्लिप लावले आहेत. तेसुद्धा तिच्या सर्वांसमोर येणाऱ्या पहिल्यावहिल्या क्षणी. मला फार आनंद होतोय. तुमचे खूप खूप आभार रणबीर आणि आलिया...', असं या चाहत्यानं लिहिलं. त्यानं सोबत हेअर क्लिपचा फोटोही जोडला. नेटकऱ्यानं जोडलेले फोटो आणि राहाच्या केसात लावलेले हेअरक्लिप यामध्ये बरंच साधर्म्य दिसत आहे. पण, आलिया किंवा रणबीर किंवा कपूर कुटुंबातील कोणीही यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. हो, पण लहान मुलांसाठी या गोड गोष्टी कुठं मिळतात हे मात्र पालकांच्या लक्षात आलं आहे. 

कुठं मिळतात हे सुपरक्यूट क्लिप्स? 

आलियाच्या लेकिला लावलेले क्लिप्स माझ्याकडूनच देण्यात आले आहेत असा दावा करणाऱ्या चाहत्यानं पोस्ट केलेल्या फोटोनुसार हे क्लिप carter`s नावाच्या वेबसाईटवर मिळतात. मुळची परदेशातील असणारीही ही वेबसाईट Firstcry वरून भारतात व्यवसाय करते. त्यामुळं तुम्ही तुमच्या मुलांसाठी असे काही सुंदर, गोड गिफ्ट शोधत असाल तर तुम्हीही हा पर्याय पाहू शकता. 

fallbacks

आलियाचा फॅशन सेन्सही कमाल... 

ख्रिसमस पार्टीच्या निमित्तानं फक्त राहाच नव्हे, तर तिची आई अर्थात अभिनेत्री आलिया भट्टसुद्धा तितकीच सुंदर दिसत होती. काळ्या आणि लाल रंगांची सांगड असणारा एक छानसा मिनी ड्रेस तिनं यावेळी घातला होता. एका बाजूला बेस स्लीव आणि दुसरीकडे टाय अप डिटेलिंग असणाऱ्या या ड्रेसला तिनं एका छानशा रेनडिअर हेअर बँडची जोड दिली होती. आलियाचा हा ड्रेस 'समर समवेयर' ब्रँडवर उपलब्ध असून त्याची किंमत आहे, 6590 रुपये. तुम्हीही खरेदी करण्याचा विचार करताय का? 

Read More