Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खान आता करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

बॉलिवूडचा दबंग खान सलमान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो

सलमान खान आता करतोय 'या' अभिनेत्रीला डेट? व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता सलमान त्याची नवीन मैत्रीण सामंथा लॉकवुडमुळे चर्चेत आहे. खरंतर, विदेशी मॉडेल सामंथा लॉकवुडचा अनेक सुंदर फोटोंचा सोशल मीडियावर बोलबाला आहे

सलमान खानसोबत  सामंथाचा फोटो व्हायरल
या फोटोंमध्ये सामांथा बलां खूपच सुंदर दिसतेय. पण एका फोटोने सगळ्यांच लोकांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे सलमान खानसोबतचा फोटो. सलमान आणि समांथाला एका फोटोत एकत्र पाहून लोकांना अंदाज येऊ लागलाय की, दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत आहे. सलमान खानसोबत सामंथाचा फोटो व्हायरल होताच तिला अभिनेत्याची नवीन परदेशी मैत्रीण म्हटलं गेलं. जरी सामंथा लॉकवुडने अद्याप या गोष्टींवर कोणतीही विशिष्ट प्रतिक्रिया दिली नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे सामंथा लॉकवुड
समंथा ही हॉलिवूड अभिनेत्री आहे. एका मुलाखतीदरम्यान सामंथाला सलमान खानबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, 'तो खूप चांगला आहे.' याविषयी लोकं वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. आपण त्यांच्यांकडे लक्ष देऊ नये. एखाद्या गोष्टीबद्दल बोलणं हे लोकांचं काम आहे. मी सलमानला भेटले आहे, तो खूप छान व्यक्ती आहे. त्यांच्याबद्दल एवढंच मला म्हणायचे आहे. लोकांना या सगळ्या गोष्टी कुठून मिळतात कोण जाणे.'

Read More