Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक! कास्टिंग काऊचला बळी पडली?

Actress Video Leak : अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ झाला लीक? कास्टिंग काऊचचा झाली बळी! नेमकं काय घडलं अभिनेत्रीनं सोडलं मौन

अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक! कास्टिंग काऊचला बळी पडली?

Actress Video Leak : अभिनय क्षेत्रात अनेक कलाकार हे कास्टिंग काउचचा शिकार झाल्याचे ऐकतो. नुकतीच तमिळ अभिनेत्री श्रुती नारायणचा कथित 14 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला. सोशल मीडियावर तिचा हा कास्टिंग काऊचचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून त्यांची सगळीकडे चर्चा सुरु आहे. यावरून सुरु झालेल्या वादानंतर तमिळ अभिनेत्रीनं या प्रकरणात मौन सोडलं असून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर तिनं या प्रकरणात सत्य सांगत एक पोस्ट शेअर केली आहे.

तमिळची लोकप्रिय अभिनेत्री श्रुतीचे कथित व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तिचे हे कथित व्हिडीओ हे कोणत्या ऑडिशन दरम्यानचे असल्याचे म्हटले जात आहे. आता अभिनेत्रीन त्यावर प्रतिक्रिया देत सगळ्यांना इशारा दिला आहे की हा व्हिडीओ एआयच्या मदतीनं बनवण्यात आला आहे. तर तिनं अशा प्रकारचे व्हिडीओ शेअर करण्यांवर निशाणा साधला आहे. श्रुतीनं हे सगळं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केलं आहे. 

एआयच्या मदतीनं आज व्हिडीओ बनवणं किती सोपं आहे असं म्हणतं तिनं या सगळ्याचा त्रास होत असल्याचं सांगितलं एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की 'तुमच्यासाठी माझ्याविषयीचे हे सगळे कंटेन्ट पसरवणं एक विनोद आहे आणि मस्करी वाटू शकते. पण माझ्या आणि माझ्या जवळच्या लोकांसाठी हे खूप कठीण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी हा सगळ्यात कठीण काळ आहे आणि ही परिस्थिती सांभाळणं खूप कठीण आहे. मी एक मुलगी आहे आणि माझ्या देखील काही भावना आहेत आणि माझ्या जवळच्या लोकांना देखील भावना असून हे सगळं करून तुम्ही वाईट बनवत आहात.'

श्रुतीनं पुढे लिहिलं की 'मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की जंगलात आग लागल्यानंतर कशी ती पसरते तशा प्रकारे या सगळ्या गोष्टी पसरवल्या जातात. जर इतकंच आहे तर तुमची आई आणि बहीण किंवा मग गर्लफ्रेंडचा व्हिडीओ पाहा. कारण त्या देखील एक मुलगी किंवा महिला आहे आणि त्यांचं शरीर देखील माझ्यासारखंच आहे आणि त्यांचा व्हिडीओ एन्जॉय करा.' 

हेही वाचा : 'पांडव कधीपासून चक्रव्यूह रचू लागले', रितेश आणि अजय देवगणच्या Raid 2 चा जबरदस्त टीझर प्रदर्शित

श्रुती नारायणन ही 24 वर्षांची अभिनेत्री आहे. ती चेन्नईची असून तिनं तमिळ मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटात येण्याआधी ‘सिरागडिक्का आसाई’ मध्ये केलेल्या अभिनयाच्या जोरावर तिला लोकप्रियता मिळाली. याशिवाय वरुण धवन आणि समांथा रुथ प्रभूच्या सिटाडेलमध्ये दिसली होती. 

Read More