Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : 'मित्रों'च्या रोमांटिक गाण्याची धम्माल... सोशल हीट

याआधी कृतिका कुछ तो लोग कहेंगे तसंच चंद्रकांता या सिरीयलमध्ये महत्त्वांच्या भूमिकांत दिसली होती

VIDEO : 'मित्रों'च्या रोमांटिक गाण्याची धम्माल... सोशल हीट

मुंबई : बॉलिवूडची नवी जोडी जॅकी भगनानी आणि कृतिका कामरा यांचा 'मित्रों' हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर दाखल होतोय. या सिनेमाचं दुसरं गाणं 'संवरने लगे' प्रदर्शित करण्यात आलंय. या गाण्यात जॅकी आणि कृतिका यांची केमिस्ट्री दिसतेय. उल्लेखनीय म्हणजे, दिग्दर्शक नितिन कक्कड यांनी जॅकी आणि कृतिकाला सिनेमा सुरू होण्यापूर्वी बाहेर भेटण्यासाठी किंवा मजा-मस्ती करण्यासाठी मनाई केली होती. 

'द पार्टी इज ओवर नाओ' या सिनेमाच्या पहिल्या गाण्यालाही प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. यो यो हनी सिंहनं हे गाणं गायलं होतं. 

या सिनेमातून कृतिका बॉलिवूड डेब्यू करतेय. याआधी कृतिका कुछ तो लोग कहेंगे तसंच चंद्रकांता या सिरीयलमध्ये महत्त्वांच्या भूमिकांत दिसली होती.

'मित्रों' हा सिनेमा १४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतोय. या सिनेमात प्रतिक गांधी, शिवम पारिख आणि नीरज सूद यांच्यादेखील भूमिका आहेत. 

Read More