Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : सेल्फी काढताना अभिनेत्रीवर हल्ला, व्हायरल झाला व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा 

धक्कादायक : सेल्फी काढताना अभिनेत्रीवर हल्ला, व्हायरल झाला व्हिडिओ

मुंबई : बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी (Digangana Suryavanshi) वर हल्ला झाला आहे. हा हल्ला सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. दिगांगनावर झालेला हल्ल्याचा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. मात्र दिगांगनाचा हा व्हिडिओ बघून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 

या व्हिडिओत दिगांगना एका सुंदर मोरासोबत उभी आहे. तिला त्याच्यासोबत फोटो काढायचा होता. त्यामुळे ती हळूहळू मोराच्या दिशेने सरकू लागली. याचवेळी तो मोर अचानक दिगांगनाकडे उडून आला आणि त्याने तिच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दिगांगना खूप घाबरली आणि ती ओरडू लागली. 

या व्हिडिओची चर्चा सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. युझर्स देखील दिगांगनाची खिल्ली उडवत आहे. हा व्हिडिओ पाहताना प्रत्येकालाच हसू आवरत नाही. कामाबदद्ल बोलायचं झालं तर टीव्ही शो 'एक वीर की अरदास... वीरा' मधून अभिनेत्री दिगांगनाला लोकप्रियता मिळाली आहे. तिने यामधून आपल्या करिअरची सुरूवात केली आहे. बिग बॉस 9 मध्ये देखील दिगांगना दिसली आहे. तसेच आगामी सिनेमा 'फ्रायडे' आणि 'जलेबी' मध्ये दिसणार आहे. तसेच लवकरच ती अर्जुन रामपालच्या 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव'मध्ये देखील दिसणार आहे.

Read More