Marathi News> मनोरंजन
Advertisement

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्री Just Engaged

पाहा साखरपुड्याचे फोटो 

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्री Just Engaged

मुंबई : झी मराठीवरील 'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मालिकेत असंख्य प्रश्न विचारून गोंधळ घालणारी ऍना म्हणजे अभिनेत्री पूजा ठोंबरे ही खास होती. या पूजा ठोंबरेचा नुकताच साखरपुडा झाला आहे. 

आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पूजाने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. पूजा ठोंबरेचा नामपूर येथे 14 डिसेंबर रोजी कुणाल अहिररावसोबत साखरपुडा पार पडला आहे. पूजाने दोघांचे साखरपुड्याचे फोटो पोस्ट करून अभिनेत्री आरती वडगबाळकर हिचे आभार मानले आहेत. आरतीने पूजा आणि कुणाल या दोघांचे कपडे डिझाईन केले आहेत. 

साखरपुड्याचा हा सोहळा अतिशय खासगी आणि कौटुबिंक पद्धतीने पार पडला. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता हे दोघं कधी लग्न करणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

With Pooflix... @ahirrao.kunal

A post shared by pooja thombre (@pooja__t) on

पूजा ठोंबरेने 'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेनंतर 'अमर फोटो स्टुडिओ' या नाटकांत काम केलं आहे. पूजा मुळची औरंगाबाद येथील बीड जिल्ह्यातील आहे. बीडच्या केएसके महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागाची माजी विद्यार्थिनी आहे. 

Read More