Dilip Kumar and Raj Kapoor : सध्या पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्ध परिस्थिती पाहता सगळ्यांची चिंता वाढली आहे. दहशतवादाच्या विरोधात असलेल्या भारताच्या या लढाईत पाकिस्तानी कलाकारांना बॅन करण्यापासून , ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांचे शो, चित्रपट, गाण्यांवर देखील बॅन आणला आहे. तर आज आपण एका अशा दिग्गज कलांकाराविषयी जाणून घेणार आहोत ज्यांची वडिलोपार्जीत घरं ही पाकिस्तानात आहेत. खरंतर, पाकिस्ताननं या कलाकारांच्या घरांचं संवर्धन करण्याचे वचन दिले तरी देखील त्यांनी त्यावर काही खर्च केलेला नाही. तुम्ही विचार करत असाल की असे कोणते कलाकार आहेत ज्यांच्या घराच्या संवर्धनासाठी विचारणा करण्यात आली होती. तर या कलाकारांची नावं दिलीप कुमार आणि राज कपूर आहेत. या दोघांचं वडिलोपार्जित घर हे भारतात नसून पाकिस्तानमध्ये आहे. तर त्यांच्या या हवेलीची किंमत ही कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.
पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजारात राज कपूर यांच्या या वडिलोपार्जित हवेलीचं नाव 'कपूर हवेली' असं आहे. असं म्हटलं जातं की ही हवेली पृथ्वीराज कपूर यांचे वडील दीवान बशेश्वरनाथ कपूर यांनी बनवली होती. पाकिस्तानची ही हवेली ऋषि कपूर याच्यासाठी खूप खास होती आणि हेच कारण होतं की जेव्हा ते तिथे गेले तेव्हा 2017 मध्ये त्यांनी एक ट्वीट करत सांगितलं की 'मी 65 वर्षांचा झालो आहे आणि मरण्या आधी मला पेशावर पाहायचं आहे. माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी त्यांचं मुळ कुठे आहे हे पहावं.'
दरम्यान, राज कपूर हे फक्त 6 वर्षांचे होते जेव्हा ते त्यांच्या कुटुंबासोबत 1930 मध्ये मुंबईत आले होते. त्यानंतर त्यांचं आणि पेशावरचं नातं घट्ट राहिलं नाही आणि 1947 मध्ये झालेल्या फाळणीनंतर त्यांचे तिथे जाण्याचा संबंध आलाच नाही. इतकंच नाही तर या हवेलीला पाडण्यासाठी काही काळापूर्वी याचिका देखील करण्यात आली होती. मात्र, कोर्टानं ती याचिका फेटाळली.
दरम्यान, असं म्हटलं जातं की या हवेची अवस्था इतकी वाईट झाली आहे की कधीही ही कोसळू शकते. तर अशी देखील चर्चा आहे की पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे की ते या हवेलीला संग्रहालय बनवणार होते पण हवेलीच्या मालकासोबत या विषयी करार होऊ शकला नाही. दरम्यान, या हवेलीचे सध्याचे मालक हे हाजी मुहम्मद इसरार आहेत. त्यांना या हवेलीच्या जागी शॉपिंग कॉम्प्लॅक्स उभारायचा आहे. कपूर हवेलीच्या नावावर असलेल्या या राज कपूर यांच्या घराला 2016 मध्ये प्रांतीय सरकारनं राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले.
हेही वाचा : 'बजरंगी भाईजान' च्या सीक्वलमध्ये दिसणार पाकिस्तानी रिपोर्टर चांद नवाब? नवाजुद्दीन सिद्दीकचा खुलासा
याशिवाय पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूख्वा या ठिकाणी दिवंगत अभिनेता दिलीप कुमार यांचं वडिलोपार्जित घर आहे. त्याची अवस्था देखील खूप खराह आहे. तर पाकिस्तानी सरकारनं त्याच्या दुरुस्तीवर एकही रुपया खर्च केलेला नाही. या घराला त्यावेळचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी राष्ट्रीय वारसा घोषित केलं होते. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार राज कपूर यांच्या या हवेलीची किंमत ही 11.5 मिलियन रुपये आणि दिलीप कुमार यांच्या या वडिलोपार्जित घराची किंमत 7.2 मिलिय रुपये असल्याचं म्हटलं जातं.