Marathi News> मनोरंजन
Advertisement

जेव्हा लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिलीप कुमार यांच्या एन्ट्रीनं झाला गोंधळ; स्टेज मोडला अन्...

Dilip Kumar : दिलीप कुमार यांची लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हजेरी आणि झालेला गोंधळ... 

जेव्हा लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिलीप कुमार यांच्या एन्ट्रीनं झाला गोंधळ; स्टेज मोडला अन्...

Dilip Kumar : दिलीप कुमार हे त्यांच्या काळातील अर्थात 50-60 च्या काळातील सगळ्यात गूल लूकिंग कलाकारांपैकी एक होते. दिलीप कुमार यांना 'ट्रॅजडी किंग' म्हणून लोकं ओळखतात. मुली त्यांच्या प्रेमात वेड्या होत्या. त्यांची एक झलक मिळावी म्हणून मुली अनेक दिवस त्यांच्या घराच्या बाहेर थांबून राहायच्या. दिलीप कुमार यांच्या लोकप्रियतेविषयी इतकी होती की एकदा ते एका वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचले होते. तेव्हा त्यांना पाहून त्यांच्या चाहत्यांनी इतकी गर्दी केली की नवरा-नवरी ज्या स्टेजवर होते तो स्टेजच मोडला. 

दिलीप कुमार यांचा हा किस्सा फराह खाननं शेअर केला आहे. दिलीप कुमारनं 2021 मध्ये अखेरचा श्वास घेतला. या दरम्यान, फराह खाननं दिलीप कुमार यांना श्रद्धांजली देत एक पोस्ट शेअर केली होती. फराह खाननं या पोस्टमध्ये दिलीप कुमार यांचा एक फोटो शेअर केला होता. तो फोटो शेअर करत तिनं सांगितलं की वेडिंग रिसेप्शनमध्ये सगळा गोंधळ उडाला होता. फराह देखील या लग्नाचा भाग झाली होती आणि त्यावेळी ती खूप छोटी होती. 

फराह खाननं दिलीप कुमार यांच्या संबंधीत एक किस्सा शेअर करत तिनं सांगितलं की, 'मी 4 वर्षांची होती जेव्हा मी पहिल्यांदा इतकी गर्दी पाहिली होती. दिलीप कुमार एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले होते. त्यांना पाहून लोकं पागल झाले होते. महिला त्यांना पाहण्यासाठी वेड्या झाल्या. जिथे नवरा-नवरीचं जोडपं उभं होतं ते तुटलं. इतकी क्रेझ होती. त्यांची ट्रॅजडी किंग अशी ओळख होती. पण मी कायम त्यांच्या कॉमेडी टायमिंगची चाहते होते. त्यांच्यासारखं कोणी नसेल.'

हेही वाचा : 'आईच्या अंत्यदर्शनलाही जाऊ दिलं नाही', पाकिस्तानची कटु आठवण सांगताना अदनान सामी झाला भावूक!

दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 मध्ये ब्रिटिश इंडियाच्या पेशावर या ठिकाणी झाला होता. आता पेशावर हे पाकिस्तानमध्ये आहे. दिलीप कुमार यांनी जेव्हा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं तेव्हा त्यांचं नाव युसुफ खान होतं. पण त्यावेळी एका लोकप्रिय अभिनेत्रीनं नाव बदलण्याचा सल्ला दिला. त्यानंतर युसुफ खान हे दिलीप कुमार झाले. या नावानं त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की आजपर्यंत लोकं त्यांना विसरू शकले नाही. दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट 'ज्वार भाटा' होता आणि त्यानंतर त्यांनी 'आन', 'देवदास', 'दाग', 'मुसाफिर', 'मुगल-ए-आजम' आणि 'आजाद' या चित्रपटांमध्ये काम केलं. 

Read More