Marathi News> मनोरंजन
Advertisement

दिलजीत दोसांझनं विल स्मिथसोबत केला भांगडा; VIRAL VIDEO एकदा पाहाच

Diljit Dosanjh and Will Smith : दिलजीत दोसांझ आणि विल स्मिथचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिलजीत दोसांझनं विल स्मिथसोबत केला भांगडा; VIRAL VIDEO एकदा पाहाच

Diljit Dosanjh and Will Smith : लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. नुकताच त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यानं हॉलिवूड अभिनेता विल स्मिथसोबत भांगडा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दिलजीतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिलजीत दोसांझ हा आणि विल स्मिथ दिसून येत आहे. त्या दोघांनी मिळून भांगडा केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघं 'केस' या गाण्यावर भांगडा करताना दिसत आहेत. दिलजीतनं शेअर केलेल्या या व्हिडीओला शेअर करत त्यानं कॅप्शन केलं की 'पंजाबी आले...'. व्हिडीओमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की सुरुवातीला विल स्मिथ त्याच्या हातात असलेल्या फोनमघून दिलजीतचा फोटो दाखवतो आणि त्यानंतर अचानक दिलजीत तिथे येतो. फोटोप्रमाणेच दिलजीत हा पांढरा कुर्ता-पायजमा आणि लाल पगडी परिधान करून समोर आल्याचं दिसतं. दोघं या पंजाबी गाण्यावर मज्जा करत भांगडा करताना दिसले. इतकंच नाही तर दोघांनी एकमेकांच्या डान्स स्टेप या फॉलो केल्या आहेत. 

हा व्हिडीओ पाहता नेटकरी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, फक्त सर्वसामान्य आणि चाहत्यांनी नाही तर सेलिब्रिटींनी देखील त्यावर कमेंट केली आहे. त्यात एक कमेंट ही नोरा फतेहीनं देखील केली आहे. तिनं हसायचे आणि डोळ्यात हार्ट असलेले असे इमोजी शेअर केले आहेत. अशा अनेक कमेंट सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर यांनी केल्या आहेत. तर एक नेटकरी म्हणाला की 'विल स्मिथला फक्त दिलजीत सांभाळू शकतो.' तर या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'आज इंटरनेटवर सगळ्यात जास्त व्हायरल होत आहे.' आणखी एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'आम्ही याची अपेक्षाही केली नव्हती.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हे सगळ्यात चांगलं कोलॅबरेशन आहे.' दिलजीत आणि स्मिथचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

हेही वाचा : ऋषी कपूर ते अमिताभ बच्चन... रुग्णालयात कसे वागतात सेलिब्रिटी?

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये विल स्मिथमध्ये दिलजीतच्या एका पोस्टवर फायरची कमेंट केली होती. ज्यावर दिलजीतनं रिअ‍ॅक्ट केलं होतं. आता दोघांचा एक डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे आता त्या दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद होत आहे. या आधी देखील दिलजीतनं प्रभास, दीपिका पदुकोणसोबत अनेक सेलिब्रिटींसोबत डान्स व्हिडीओ शूट केले आहेत. 

Read More