Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिकाला स्टेज-2 कर्करोगाचे निदान; स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितलं नेमकं काय घडलं

Dipika Kakar Post On Liver Tumor: अभिनेत्री दीपिका कक्कर हिला कर्करोगाचे निदान झाले असून स्टेज 2चा लिव्हर कॅन्सरल असल्याचे निदान झाले आहे. 

दीपिकाला स्टेज-2 कर्करोगाचे निदान; स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सांगितलं नेमकं काय घडलं

Dipika Kakar Post On Liver Tumor: टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर हिला कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. दीपिकाला स्टेज 2चा यकृताचा कर्करोग झाल्याची माहिती तिने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. तसंच, चाहत्यांना प्रार्थना करण्याचेही अवाहन केले आहे. दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिम यांनी काही दिवसांपूर्वी एक व्लॉगकरत दीपिकाच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, अभिनेत्रीच्या लिव्हरमध्ये ट्युमर आहे. 

दीपिका कक्करने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले आहे की, 'तुम्हाला माहिती असेलच गेले काही आठवडे माझ्यासाठी खूप कठिण गेले आहेत. पोटाच्या वरच्या भागात सतत दुखत असल्याने रुग्णालयात जावं लागले. तेव्हा कळलं की लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्यूमर आहे. चाचणीनंतर कळलं की ट्यूमर दुसऱ्या स्टेजचा कर्करोग आहे.'

पोस्टमध्ये दीपिकाने म्हटलं आहे की, हा आत्तापर्यंतचा आमच्यासाठीचा कठिण काळ आहे. मात्र मी पूर्णपणे सकारात्मक आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यातून मी लवकरात लवकर बाहेर पडणार आहे. माझं पूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. तुमच्यासगळ्यांचे प्रेम आणि दुआ मिळताहेत. मी लवकरच या परिस्थितीतून बाहेर पडेन, असं दीपिकाने पोस्टमध्ये लिहलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipika (@ms.dipika)

दीपिका कक्करच्या आजारपणाबद्दल ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी रिअॅक्शन दिली आहे. तसंच, लवकर बरं होण्याची प्रार्थना केली आहे. ससुराल सिमर का या मालिकेत भूमिका साकारणारी अविका गौर हिने देखील तिच्या पोस्टवर कमेंट करत म्हटलं आहे की, तु लवकरच ठिक होशील, मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. तर जयती भाटियाने म्हटलं आहे की, तु हिम्मत हारू नकोस, तु खूप बहादूर आहेस. 

दीपिकाचा पती शोएब इब्राहिमने तिच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अभिनेत्रीची पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्याने एक पोस्ट करत म्हटलं आहे की, दीपिकाचे हेल्थ अपडेट देतोय. तिचा ताप आता नियंत्रणात आहे. ती घरी पुन्हा आली आहे. जर सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर तिच्यावर पुढील आठवड्यात शस्त्रक्रिया होईल. प्लीज तिच्यासाठी प्रार्थना करा. तसंच, त्याने पुढे म्हटलं आहे की, सबा आणि खालिद हे पालक झाले आहेत. त्यांच्या बाळाला आणि सबालादेखील आशीर्वाद द्या. 

Read More