Marathi News> मनोरंजन
Advertisement

Subhedar Movie Review : बरंच शिकवून जातोय सिंहगडाचा रणसंग्राम; 'सुभेदार' पाहण्याआधी वाचा चित्रपटाचा रिव्ह्यू

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'सुभेदार' या मराठी  चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे.  

Subhedar Movie Review : बरंच शिकवून जातोय सिंहगडाचा रणसंग्राम; 'सुभेदार' पाहण्याआधी वाचा चित्रपटाचा रिव्ह्यू

मुंबई : सुभेदार हा सिनेमा २५ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवराज अष्टकमधील पाचवं पुष्प पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भली मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे. मराठी सिनेमातील भव्यता हे या सिनेमाचं मुख्य आकर्षण आहे.  सुभेदार सिनेमा उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नरवीर तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमावर आधारीत हा सिनेमा पाहण्याची उत्कंठा शिगेला आहे.

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'सुभेदार' या मराठी  चित्रपटातून आपल्यासमोर उलगडणार आहे.  लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याआधीच्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या चित्रपटांच्या जबरदस्त यशातून त्यांची  या विषयावरची आपली कमालीची पकड सिद्ध केली आहे. 

कसा आहे हा सिनेमा
सिनेमातील कलाकारांनी जीव ओतून काम केलं आहे. सिनेमातील गाणी काळजाला भिडतात. सिनेमात असे अनेक सीन आहेत ज्यामुळे तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कोंढाणा जिंकण्यासाठी आखलेली मोहीम या सिनेमातून दाखवण्यात आली आहे. जिजाऊंची महाराजांना असलेली खंबीर साथ याचंही चित्रण समर्पकरित्या करण्यात आलं. कोंढाणा जिंकण्याची घटना ही सर्वांत मोठी असली तरी त्यामागे असलेलं त्यांचं युद्धकौशल्य, रणनिती, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल केलेला अभ्यास यांसारख्या अनेक बारिकसारिक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.  'आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं' असं म्हणत कोंढाण्याची मोहीम हाती घेत विडा उचलला होता. फक्त ५०० मावळे घेवून तानाजी मालुसरे या किल्ल्याच्या मोहीमेसाठी गेले होते. अजय पुरकर यांनी तानाजी मालुसरे यांचं पात्र खूपचं दमदार साकारलं आहे. नेहमीचप्रमाणेच मृणाल कुलकर्णीआणि चिन्मय मांडलेकर यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. 

'शिवराज अष्टक' या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' 'शेर शिवराज' या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या  चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्या साथीने कोंढाणा हा किल्ला कसा जिंकला हे दाखवलं आहे. 

या लढाईत तानाजी मालुसरेंना वीरमरण आले आणि प्राणाचे बलीदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे. मग सूर्याजी मालुसरे यांनी हिंमत धरून, कूल लोक सावरून उरलेले राजपूत मारले आणि किल्ला काबीज केला. शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची बातमी मिळाली पण तानाजी यांना वीरमरण आल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले, 'गड आला, पण सिंह गेला'. वेशभुषा, अभिनय, लोकेशन, यातून सिनेमाची भव्यता समजते. पहिला भाग थोडासा खेचल्यासारखा वाटतो. मात्र सिनेमाच्या दुसऱ्या भागात रंगत येते. सिनेमात अनेक भावूक सीन आहेत. त्यामुळे प्रत्येकाने हा सिनेमा पाहावा असा आहे. त्यामुळे आम्ही या सिनेमाला देतोय 4 स्टार....

आम्ही या सिनेमाला देतोय 4 स्टार....

सिनेमाचं नाव - 'सुभेदार'
प्रदर्शनाची तारिख - 25-08-2023
सिनेमाचे दिग्दर्शक - दिग्पाल लांजेकर

सिनेमाचे स्टार - 4

Read More