Marathi News> मनोरंजन
Advertisement

‘मी मात्र अजूनही तुला स्थिरता देऊ शकलेलो नाही’, पत्नीसाठीच्या पोस्टमध्ये केदार शिंदेंनी रितं केलं मन...

Relationship : खास दिवसाला खास पोस्ट लिहित केदार शिंदे यांनी मनातील भावना शब्दांत मांडल्या.... त्यांच्या पोस्टचं कॅप्शनच ठरतंय चर्चेचा विषय...

‘मी मात्र अजूनही तुला स्थिरता देऊ शकलेलो नाही’, पत्नीसाठीच्या पोस्टमध्ये केदार शिंदेंनी रितं केलं मन...

Kedar Shinde : मराठी चित्रपटांच्या दुनियेत काही कमाल कलाकारांना प्रेक्षकांच्या भेटीला आणणाऱ्या आणि दिग्दर्शन क्षेत्राल उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या केदार शिंदे यांनी कायमच काळाला अनुसरून काही कथानकं प्रेक्षकांसाठी सादर केली. नाटक म्हणू नका, चित्रपट म्हणू नका किंवा अगदी मालिका म्हणू नका. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपलं वेगळेपण जपलं. अशा या कलाकाराच्या कार्यक्षेत्रामध्ये जो सर्वस्व झोकून देत काम करत असतानाच त्यांचा आधार ठरती ती म्हणजे त्यांची पत्नी.

केदार शिंदे यांच्या या नात्यावर चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांनी हल्लीच केलेली एक पोस्ट. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत ही पोस्च लिहिली, जिथं त्यांनी मन रितं करत भावना अगदी सहजपणे मांडल्या. शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते कोणा एका चित्रपटाच्या सेटवर असल्याचं दिसत असून, एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांची पत्नीसोबत चर्चा सुरू असल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळालं.

पत्नीनं दिलेली साथ किती महत्त्वाची होती, याबाबत सांगताना केदार शिंदे लिहितात, ‘असंख्य चांगले फोटो आहेत. पण आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हाच फोटो टाकावासा वाटला. तू गेली 29 वर्षे सोबत आहेस. तू माझ्या अडचणीच्या काळात खंबीरपणे उभी राहतेस. याही फोटोत माझ्या चेहऱ्यावर जे frustrating भाव आहेत आणि तुझ्या चेहेऱ्यावरचा जो शांत भाव आहे, तो आपल्या दोघांच्या स्वभावातला फरक सांगून जातो. मी अजूनही वेड्या कल्पनांच्या मागे धावतो आणि तू नेहमीच माझ्या वेडेपणाला साथ देतेस. यशात तू कधीच पुढे येत नाहीस. अपयशात मात्र ढाल होऊन संरक्षण करतेस.

मी मात्र अजूनही तुला स्थिरता देऊ शकलेलो नाही. तू मात्र माझ्या अस्थिरतेला सवयीचं करून घेतलंयस. नेहमीच अशा पोस्टमधून तुला खात्री देतो. पण पुर्ण काही करत नाही. तरीही पुढच्या माझ्या वेडेपणात तू अशीच सोबत असशील, हे ठाऊक आहे. तेव्हाही असाच working फोटो कुणीतरी काढेल. पण तो टाकून पुन्हा हेच सगळं मी लिहू नये, हीच स्वामी चरणी प्रार्थना.’

नात्यामध्ये येणारे चढ उतार, प्रत्यक्ष जीवनातील वादळं आणि अशा अनेक समस्यांमध्ये पती- पत्नीची एकमेकांना असणारी साथ नेमकी किती महत्त्वाची असते हेच नकळत या दिग्दर्शकानं स्वत:च्याच अनुभवातून चाहत्यांनाही पटवून दिलं, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

Read More