Marathi News> मनोरंजन
Advertisement

RRR सिनेमासाठी आलिया भट्टचीच निवड का केली? दिग्दर्शकाकडून मोठी गोष्ट रिवील

येत्या वर्षभरात आलिया भट्ट तिच्या चाहत्यांसाठी तीन मोठे चित्रपट घेऊन येत आहे. 

  RRR सिनेमासाठी आलिया भट्टचीच निवड का केली? दिग्दर्शकाकडून मोठी गोष्ट रिवील

मुंबई : येत्या वर्षभरात आलिया भट्ट तिच्या चाहत्यांसाठी तीन मोठे चित्रपट घेऊन येत आहे. यातील सर्वाधिक चर्चा 'RRR'ची आहे. साऊथच्या अभिनेत्रींशिवाय हा चित्रपट त्यांना कसा काय मिळाला, असा प्रश्नही सगळ्यांच्या मनात आहे. आता प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांनीच याचे उत्तर दिले आहे.

आलिया भट्टची निवड करण्यामागे हेच कारण...

एसएस राजामौली म्हणतात की, 'राझी'मधील आलिया भट्टच्या अभिनयाने ते खूप प्रभावित झाला होते. याच कारणामुळे आगामी बिग बजेट चित्रपट 'RRR'मध्ये सीतेच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांनी तिची निवड केली आहे.

fallbacks

राजामौली म्हणाले, 'माझ्यासाठी चित्रपटात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, आग आणि पाणी. म्हणजेच राम आणि भीम, जे अतिशय बलवान आणि विशेष आहेत. माझ्यासाठी सीतेचे पात्र बाहेरून खूप नाजूक आहे. पण आतून खूप मजबूत आहे.

मी 'राझी' पाहिला आणि आलियाच्या कामाने प्रभावित झालो. एक सामान्य स्त्री तिच्या क्षमतेपेक्षा जास्त कशी करू शकते हे पाहून मला धक्का बसला. तर, सीतेच्या पात्राबद्दल बोलायचे झाले तर सगळ्यांची पसंती आलिया होती.

fallbacks

आलियाला धक्काच बसला

राजामौली पुढे म्हणाले, 'मला माहित होते की आलिया माझ्या चित्रपटात भूमिका साकारण्यास नक्कीच सहमत होईल. आम्ही तिला विचारले तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

Read More