Marathi News> मनोरंजन
Advertisement

टायगर श्रॉफ- दिशा पटानीच्या नात्याला ग्रहण

त्यांच्यासोबतच्या मैत्रीमुळे.....

टायगर श्रॉफ- दिशा पटानीच्या नात्याला ग्रहण

मुंबई : सिनेसृष्टीत कधी कोणाचे सुत कोणासोबत जुळतील सांगता येत नाही, तर दुसरीकडे कोणाचा प्रेमभंग होईल याचा ठावठिकाणा नाही. असचं काहीस झालयं अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटनी यांच्या नात्याबद्दल. गेल्या काही दिवसांपासून टायगर आणि दिशा यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत.


दिशा आणि टायगरच्या नात्याच्या या चर्चा जरा जास्त गंभीर आहेत. कारण, हे प्रेमी युगूल विभक्त झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड झाल्याचे समोर येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy birthday Ddishapatani

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

'पिंकव्हिला'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, टायगर आणि दिशा आता एकत्र नाही. ते दोघे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. टायगर- दिशाच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे. या दोघांनी संगनमताने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी दोघांची मैत्री अबाधीत राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.   


दिशा आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची वाढती मैत्री त्यांच्या ब्रेकअपसाठी कारणीभूत असल्याचे मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे. तर टायगरचे नाव आता अभिनेत्री तारा सुतारिया सोबत जोडण्यात येत आहे. दिशा सध्या तिच्या 'मंगल' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

Read More