Marathi News> मनोरंजन
Advertisement

आदित्य ठाकरेंसोबतच्या 'त्या' व्हायरल फोटोंविषयी दिशाचे नेटकऱ्यांना उत्तर...

 नेटकऱ्यांकडून करण्यात आलेल्या ट्रोलिंगला दिशाने उत्तर दिले आहे. 

आदित्य ठाकरेंसोबतच्या 'त्या' व्हायरल फोटोंविषयी दिशाचे नेटकऱ्यांना उत्तर...

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात बॉलिवूडकर नेहमीच प्रकाशझोतात असतात. त्याचप्रमाणे ही बॉलिवूडची मंडळी प्रत्येक वेळेस नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा शिकार होत असतात. सध्या अभिनेत्री दिशा पटनी ट्रोलिंच्या जाळ्यात अडकली आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिशा पटनी मुंबईतील एका हॉटेलमधून बाहेर पडतानाचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर नेटकऱ्यांकडून तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले. नेटकऱ्यांकडून करण्यात आलेल्या ट्रोलिंगला दिशाने उत्तर दिले आहे. 

ट्रोल करण्यात आल्यानंतर दिशाने, आपल्या आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, 'एक मुलगा आणि मुलगी एकत्र डिनर जाऊ शकत नाही का? मैत्री करताना कधीही लिंगभेद करत नाही. माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये फक्त मैत्रीणीच नाहीत, मित्रही आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणी असतात. मी माझ्या करियरच्या ज्या टप्प्यावर आहे, तिकडे प्रत्येक जण माझ्याबद्दल अनेक मतं मांडतील, पण मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते.'

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिशा पटनी मुंबईतील एका हॉटेलमधून बाहेर पडतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर ती चांगलीच ट्रोल झाली. 'टायगर जिंदा है?', 'टायगर कहाँ है?' अशा प्रकारे तिला ट्रोल करण्यात येत होते. अखेर तिने आपल्यात आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात मैत्रीचे नाते असल्याचे सांगत, संपूर्ण चर्चांना पूर्णविराम लावला आहे.  

Read More