Marathi News> मनोरंजन
Advertisement

आदित्यसोबतच्या डिनर डेटबद्दल दिशा म्हणते...

दिशाला ट्रोल करताना लोकांनी सोशल मीडियावर 'टायगर कहाँ है?'.... 'टायगर अभी जिंदा है' अशा कमेंटस् करणं सुरू केलं होतं

आदित्यसोबतच्या डिनर डेटबद्दल दिशा म्हणते...

मुंबई : शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे आणि 'भारत'फेम अभिनेत्री दिशा पटनी यांच्या डिनर डेटच्या चर्चा जशा राजकीय वर्तुळात रंगल्या तशाच त्या बॉलिवूड वर्तुळातही चर्चिल्या गेल्या. नुकतंच जुहूच्या एका रेस्टोरन्टमध्ये आदित्य आणि दिशाला डिनरसाठी एकत्र जाताना पाहिलं गेलं होतं. त्यानंतर दिशा आणि आदित्यच्या या 'डेट'विषयी चर्चांणा उधाण आलं. इतकंच नाही तर यामुळे सोशल मीडियावर दिशाला ट्रोलही केलं गेलं. याच ट्रोल्सला आता दिशानं प्रत्यूत्तर दिलंय. 

'पिंकविला'नं दिलेल्या माहितीनुसार, 'आपल्या मित्रांसोबत लंच किंवा डिनरला नाही जाऊ शकत का?' असा उलट सवाल आता दिशानं ट्रोलर्सना विचारलाय. 'मी माझ्या मित्रवर्गाची निवड त्यांच्या लिंगाच्या आधारावर करत नाही. मी ज्यांच्यासोबत असते ते माझे मित्र असतात. मी केवळ फिमेल फ्रेंडपुरती मर्यादित राहू शकत नाही... प्रत्येकाचे मेल आणि फिमेल फ्रेन्डसही असतात' असंही दिशानं म्हटलंय. 

दिशाला ट्रोल करताना लोकांनी सोशल मीडियावर 'टायगर कहाँ है?'.... 'टायगर अभी जिंदा है' अशा कमेंटस् करणं सुरू केलं होतं. याअगोदर दिशा पटनी हिला अभिनेता टायगर श्रॉफसोबत डिनर आणि आउटिंगसाठी जाताना पाहिलं गेलंय. पण, सध्या दिशा मात्र करिअरमधील आपलं यश एन्जॉय करतेय. 

Read More