Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्कूल यूनिफॉर्ममध्ये एवढी साधी दिसायची दिशा पटाणी, फोटो बघून बसणार नाही विश्वास

बॉलिवूडची ब्युटी क्वीन आणि स्टाईल आयकॉन अभिनेत्री दिशा पटानीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

 स्कूल यूनिफॉर्ममध्ये एवढी साधी दिसायची दिशा पटाणी, फोटो बघून बसणार नाही विश्वास

मुंबई : बॉलिवूडची ब्युटी क्वीन आणि स्टाईल आयकॉन अभिनेत्री दिशा पटानीचे प्रत्येक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतातच. तिच्या चाहत्यांनी तिच्या प्रत्येक कामावर भरभरुन प्रेम केलं आहे. पण यावेळी दिशा पटानीचे जुने फोटो व्हायरल होत आहे. दिशाचे हे जुने फोटो पाहून तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.

शाळेच्या गणवेशात दिशा
दिशा पटानीचे व्हायरल फोटो बरेच जुने दिसत आहेत. या फोटोमध्ये दिशा शाळेच्या गणवेशात दिसत आहे. याचबरोबर तिचे केसही खूप छोटे आहेत. दिशाचे हे फोटो किती जुने आहेत, सध्या याबद्दल माहिती नाही. दिशाच्या एका चाहत्याने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यापूर्वी एक जुना व्हिडिओ देखील समोर आला आहे
दिशा पटानीचा याआधीही एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये दिशा एका जाहिरातीचं शूट करताना दिसली. त्यावेळी दिशा फक्त 19वर्षांची होती. दिशाची जुने फोटो आणि व्हिडिओ बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हिडिओपूर्वी तिच्या मॉडेलिंगच्या दिवसात साडी नेसलेले फोटोही व्हायरल झाले होते. व्हायरल होत असल्याच्या दिशा पटानीच्या जुन्या फोटोत हे बदल स्पष्टपणे दिसत आहेत. जुन्या फोटोंमध्ये दिशा बरीच साधी दिसत आहे. त्याचबरोबर अलीकडच्या फोटोंमध्ये तिने स्वत:ला खूप ग्लॅमरस बनवलं आहे. तिच्या चाहत्यांना तिची फिगर आणि टोन्ड बॉडी खूप आवडते.

या चित्रपटात दिसली
दिशा पटानी सलमान खानसोबत 'राधे'मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. लवकरच दिशा आणखी बऱ्याच चित्रपटात दिसणार आहे. नुकताच दिशाने आपला वाढदिवस साजरा केला. टायगर श्रॉफने तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, जो खूप व्हायरल झाला होता.

Read More