Marathi News> मनोरंजन
Advertisement

बोल्ड फोटोंमुळे दिशा पटनी पुन्हा ट्रोल

अभिनेत्री दिशा पटनीची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली...

बोल्ड फोटोंमुळे दिशा पटनी पुन्हा ट्रोल

मुंबई : अभिनेत्री दिशा पटनी हिने महेंद्र सिंह धोनीच्या बायोपिक द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते त्यानंतर दिशा बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आली होती. पहिल्याच चित्रपटात दिशाची भूमिका अगदी लहान असली तरीही तिच्या भूमिकेने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवली होती हे सुद्धा तितकंच खरं. सध्या बी- टाऊनमधील ही अभिनेत्री चर्चेत आहे ते म्हणजे सोशल मीडियावरील काही फोटोंमुळे. 

दिशाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे, फोटो दिशाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिने शेअर केलेले फोटो अधिक बोल्ड असल्यामुळे सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर नेटकरी अत्यंत वाईट प्रतिक्रिया देत आहेत. तिची मोठ्या प्रमाणावर खिल्लीही उडवली जात आहे. अंतर्वस्त्रे तयार करणाऱ्या केल्विन केलिन या ब्रँडची जाहिरात ती करत आहे. पण, तिचा हा अंदाज मात्र नेटकऱ्यांना रुचलेला नाही. दरम्यान, असे फोटो शेअर करण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा तिने असे काही फोटो शेअर केले होते. 

नेटकऱ्यांचं ट्रोलिंग न जुमानणारी दिशा खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. दिशाचं नाव बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ जोडलं गेलं होत आणि सध्या तिचं नाव युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सोबत जोडलं जात आहे यामुळे दिशा त्यामुळे दिशा आणखी एकदा चर्चेत आली आहे. शिवाय दिशाला शारीरिक सुदृढतेसाठीही सुध्दा ओळखले जाते. त्यामुळे आगामी चित्रपटांपेक्षा ही अभिनेत्री बहुविध कारणांनीच जास्त चर्चेत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

Read More