Marathi News> मनोरंजन
Advertisement

'स्कॅम1992' आणि अभिषेकचा 'द बिग बुल' मध्ये होतेय तुलना; निर्मात्यांनी दिली मोठी प्रतिक्रीया

चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी आपली लोकप्रिय वेब सीरिज "स्कॅम 1992''  आणि 'द बिग बुल' चित्रपटमध्ये सुरू असलेल्या तुलनेबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. 

'स्कॅम1992' आणि अभिषेकचा 'द बिग बुल' मध्ये होतेय तुलना; निर्मात्यांनी दिली मोठी प्रतिक्रीया

मुंबई : चित्रपट निर्माता हंसल मेहता यांनी आपली लोकप्रिय वेब सीरिज "स्कॅम 1992''  आणि 'द बिग बुल' चित्रपटमध्ये सुरू असलेल्या तुलनेबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे. 

अजय देवगन निर्माते आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत असलेल्या 'द बिग बुल' या चित्रपटाचा ट्रेलर लॉंन्च करण्यात आला आहे. चित्रपत्र शेअरमार्केटमधील स्टॉकब्रोकर हर्षद मेहताच्या जिवनावर आधारीत  आहे. 

परंतु हा ट्रेलर लॉंच होताच  नेटकऱ्यांमध्ये स्कॅम 1992 या वेब सिरीजची आणि द बिग बुल या चित्रपटाची  तुलना होऊ लागली. काही वेळात ही तुलना समाजमाध्यमांवर ट्रेंडिंग  होती. त्यामुळे स्कॅम 1992 वेब सीरिजचे निर्माते हंसल मेहता यांनी याबाबत आपली प्रतिक्रीया दिली आहे.

मेहता यांनी ट्विट  करून म्हटले की, कृपया दोन्ही कलाकृतींची तुलना करू नका. एका गोष्टीचे अनेक अंग असू शकतात. प्रत्येक गोष्टीच्या सादरीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. त्यामुळे या सर्व कलाकृतींना प्रेक्षकांनी बघावे. ज्यांनी सर्वोत्तम काम केले असेल त्यांना प्रेक्षकांचे प्रेम लाभेलच.

 

Read More