Marathi News> मनोरंजन
Advertisement

'वर्जिन पत्नीच्या शोधात राहू नका, कारण...'; प्रियंका चोप्राचा तरुणाईला बोल्ड सल्ला

बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या बेबाक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशाच आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. यामध्ये तिने वर्जिनिटीवर भाष्य केलं आहे. 

'वर्जिन पत्नीच्या शोधात राहू नका, कारण...'; प्रियंका चोप्राचा तरुणाईला बोल्ड सल्ला

प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयासोबतच, प्रियांका तिच्या दमदार विधानांसाठी लोकप्रिय आहे. प्रियंकाने आपल्या सिनेमातही अतिशय स्पष्टवक्तेपणाच्या भूमिका साकारल्या आहेत. . प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. पण काही काळापूर्वी प्रियांका चोप्राने कौमार्य बद्दल असे विधान केले की सर्वांनाच धक्का बसला. या विधानातून प्रियंकाने तरुणांना बोल्ड असा सल्ला दिला आहे. 

काही काळापूर्वी प्रियांका चोप्राने कौमार्यतेबद्दल असे काही म्हटले होते ज्यामुळे खूप वाद निर्माण झाला होता. प्रियांकाने तिच्या विधानात म्हटले होते की, 'वर्जिन मुलीसोबतच लग्न करायचे म्हणून तसा शोध सुरु करु नका. अशी स्त्री शोधा जिचे आचरण चांगले आहे'. यामधून प्रियंकाला सांगायचे आहे की, कुमारी मुलीशीच लग्न करेन असा हट्ट धरु नका. प्रियांकाने तिच्या विधानात म्हटले होते की, 'तुमची पत्नी बनवण्यासाठी कुमारी मुलगी शोधू नका, अशी स्त्री शोधा जिचे आचरण चांगले आहे'.

'कौमार्य' एका रात्रीत संपते पण आचरण तुमच्यासोबत कायमचे राहते. प्रियांका चोप्राच्या विधानामुळे खूप गोंधळ उडाला. एका युझरने तिला ट्रोल करत लिहिले, 'म्हणून तुम्ही पुरुषाचे उत्पन्न आणि पैसा पाहू नका. त्याचे वर्तन आणि चांगले चारित्र्य पहा. पैसा एका दिवसात नाहीसा होईल आणि आचरण कायमचे राहील'. त्याच वेळी, एका युझरने म्हटले, 'जर मुलीचे वर्तन चांगले असेल तर ती कशीही कुमारी असेल'.

या स्टेटमेंटनंतर काही लोकांनी प्रियांकाला पाठिंबा दिला. प्रियांका चोप्राच्या या विधानाचे काही लोकांनी कौतुक केले तर काहींनी तिची खिल्लीही उडवली. दुसऱ्या एका युझरने लिहिले की, 'जर मुलीचे वर्तन चांगले असेल तर ती कुमारीच राहील.' या सगळ्यावरुन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. 

Read More