Marathi News> मनोरंजन
Advertisement

Guess The Star : या अभिनेत्याला ओळखलं का ? सध्याचा सर्वांत महागडा कॉमेडी किंग

बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रींच्या लहाणपणीचे फोटो आपण पाहिलेच असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेता आणि कॉमेडीयनचे फोटो दाखवणार आहोत, जो आताच्या घडीला सर्वात जास्त कमाई करणारा कलाकार आहे. 

Guess The Star : या अभिनेत्याला ओळखलं का ? सध्याचा सर्वांत महागडा कॉमेडी किंग

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्रींच्या लहाणपणीचे फोटो आपण पाहिलेच असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेता आणि कॉमेडीयनचे फोटो दाखवणार आहोत, जो आताच्या घडीला सर्वात जास्त कमाई करणारा कलाकार आहे. 

तुम्हाला ओळखीचा वाटतोय का हा अभिनेता? नसेल, तर आधी तिथं असणारा फोटो आणि ही माहिती वाचाच... 

कॉमेडी किंगला ओळखलंत का ? 

डोक्यावर टोपी आणि निरागस चेहरा करून आपल्या मोठ्या भावासह पोझ देणारा हा अभिनेता- कॉमेडी किंग आहे कपिल शर्मा. हा तोच कपिल शर्मा आहे, ज्याच्या शोची प्रत्येक प्रेक्षक वीकेंडला आतुरतेने वाट पाहतो.

बॉलिवूडमध्ये कपिल शर्मा आज एक मोठं नाव बनलं आहे आणि त्यामागचं कारण फक्त आणि फक्त कपिल शर्माची मेहनत आहे.
या फोटोमध्ये कपिलसोबत त्याचा मोठा भाऊ आहे, ज्यावर तो खूप प्रेम करतो. लाइमलाइटपासून दूर राहणारा कपिल शर्माचा भाऊ पोलिसात नोकरीला आहे.

हा फोटो जवळपास 31 वर्षे जुना असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावेळी कपिल शर्मा फक्त 10 वर्षांचा होता आणि आज कपिल 41 वर्षांचा आहे.कॉमेडी जगतातलं कपिल शर्मा हे नाव फार मोठं आहे.  

कॉमेडी सोबत अभिनयातही त्याने हात आजमावला आहे.  रिअॅलिटी शोनंतर आता पुन्हा एकदा नवीन चित्रपटात तो काम करताना दिसणार आहे. नंदिता दासच्या चित्रपटात झळकण्याची संधी त्याला मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवातही झाली आहे. 

'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मधून सुरुवात

कपिल शर्मा मूळचा पंजाबचा आहे. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मधून त्याने कॉमेडीला सुरूवात केली होती. या शोमध्ये, जिथे त्याला आधी नकार देण्यात आला होता, तिथे तो दुसऱ्या ऑडिशनमध्ये पास झाला होता आणि इथूनच त्याचा कॉमेडीचा प्रवास सुरु झाला. तिथून सुरु झालेल्या या प्रवासात त्यानं परत कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

Read More