Marathi News> मनोरंजन
Advertisement

बाहुली सारखी दिसणारी ही चिमुकली आहे आज बॉलिवूडची हॉट अभिनेत्री, ओळखलं का?

बॉलिवूडमध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांचा लहानपणाचा फोटो पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही.

बाहुली सारखी दिसणारी ही चिमुकली आहे आज बॉलिवूडची हॉट अभिनेत्री, ओळखलं का?

मुंबई : आज बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी खूपच संघर्ष केल्यानंतर आज खूप नाव कमावलं आहे. सगळ्यांच्याच नशीबी संघर्ष येत नसला तरी पुढे जावून किती यश मिळेल हे देखील कोणाला माहित नसतं. सध्या सोशल मीडियावर एक लहान मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. ती चिमुकली मुलगी आज बॉलिवूडची अभिनेत्री आहे.

सुपर हॉट आणि सिझलिंग लूकमुळे आपल्या चाहत्यांना ती नेहमीच धक्का देत असते. ती तिच्या चाहत्यांसाठी स्वतःचे जबरदस्त फोटो आणि व्हिडिओ नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे चाहते तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देतात आणि प्रशंसा ही करतात. अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा एक अतिशय मोहक फोटो पोस्ट केला होता. ही अभिनेत्री आहे कियारा आडवाणी.

फोटोमध्ये कियारा मका खाताना दिसत आहे. दोन्ही हातांनी मका धरून ती त्याकडे लक्षपूर्वक पाहत आहे. फोटो पोस्ट करत कियाराने लिहिले, “रविवारचा मूड. नंतर, तिने आणखी एक फोटो देखील पोस्ट केला ज्यामध्ये शेरशाह अभिनेत्री तिच्या रविवारचा स्वादिष्ट पावभाजीच्या थाळीसह आनंद घेताना आणि तिचा नवीन चित्रपट, जुगजग जीयो पाहताना दिसत आहे.

कियाराचा जुगजग जीयो हा चित्रपट 24 जून रोजी प्रदर्शित झाला. या कॉमेडी-ड्रामाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. वरुण धवन, कियारा, अनिल कपूर आणि नीतू कपूर अभिनीत राज मेहता दिग्दर्शित जुगजग जीयो सिनेमाने 82.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

कियारा पुढे RRR फेम राम चरणसोबत तेलगू चित्रपट RC-15 मध्ये दिसणार आहे. शूटिंगला सुरुवात झाली आहे. याशिवाय तिचा विकी कौशलसोबत आणखी एक प्रोजेक्ट आहे.

Read More