Dipika Kakar Mother in Law : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये दिसली. यावेळी एका एपिसोडमध्ये हिना खान आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जायसवाल स्पेशल गेस्ट म्हणून आले होते. सेटवर त्यांनी सगळ्या कलाकारांसोबत खूप मस्ती केली. त्यावेळी दीपिका कक्कडनं तिच्या सासूची खूप स्तुती केली. त्यावेळी सांगितलं की त्या कधीच तिला घरातलं काम करण्यासाठी जबरदस्ती करत नाहीत.
रॉकीनं दीपिकाला विचारलं की 'लग्नानंतर पहिल्या दिवशी काय बनवलं होतं?' त्यावर उत्तर देत दीपिका म्हणाली, 'नाही, नाही. माझी सासू अशी मुळीच नाही. त्या म्हणतात की तू बस तू काही काम करणार नाहीस. आजही जेव्हा मी थकून घरी जाते, तेव्हा मी काहीच करत नाही. अम्मी आणि शोएब दोघं बोलतात की तू बस.'
पुढे लगेच दीपिकानं केलेलं हे वक्तव्य ऐकताच फराह खान लगेच म्हणाली, 'असं कोणतं अॅप्लिकेशन आहे का की जे भरल्यानंतर अशी सासू मिळते.' हसत दीपिका म्हणाली, 'असं नाही, असा कोणताही नाही फॉर्म नाही आहे.' त्याशिवाय पुढे दीपिकानं सांगितलं की तिच्या सासूला तिनं बनवलेलं जेवण खूप आवडतं. दीपिकाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'दीपिकाचं नशिब चांगलं आहे, तिला इतकी प्रेमळ सासू मिळाली आहे.'
गेल्या काही दिवसांपासून दीपिकाविषीय अनेक गोष्टींना घेऊन चर्चा सुरु आहेत. तिच्यावर आरोप करण्यात आले होते की तिनं पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीला सोडलय. पण दीपिकानं सतत हेच सांगितलं की तिनं कोणत्याच मुलीला जन्म दिला नव्हता. तिच्या नवऱ्याला देखील ही गोष्ट माहित आहे आणि त्यानं देखील हे सांगितलं असतं.
हेही वाचा : पाकिस्तानच्या गायकाच्या शोधात जावेद अख्तर; नेटकऱ्यांनी केली सिंगर जगजीत सिंगशी तुलना
दरम्यान, आता रमजानचा महिना सुरु असून शोएब इब्राहिम हा दीपिका आणि त्याच्या आईसोबत मिळून त्याच्या जेवणाचे स्किल्स दाखवतो. त्यानं त्या दोघांसोबत मिळून काही गोड पदार्थ बनवले आहेत. त्याचे अनेक व्हिडीओ त्यांनी व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.