मुंबई : हॉलिवूड गायक आणि अभिनेता डॉनी वॉलबर्ग Donnie Wahlbergचर्चेत आलं. त्याने नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एक असं काम केलंय की ज्यामुळे तो खूप चर्चेत आला आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच डॉनीने एका वेट्रेसचं आयुष्यचं बदलून टाकलं आहे. सध्या त्याच्या या कारनाम्यामुळे तो चर्चेत आला आहे.
@DonnieWahlberg starting 2020 off like the amazing man he is. #ihop #2020tipchallenge
— Jenny McC-Wahlberg (@JennyMcCarthy) January 1, 2020
pic.twitter.com/AjAEN0hqL6
आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर एखाद्या वेट्रेसला किती टिप tip देऊ. जास्तीत जास्त दोन हजार रुपये. पण डॉनीने एका वेट्रेसला तब्बल 2020 डॉलर म्हणजे 1 लाख 44 हजार रुपयांची टिप दिली आहे. डॉनी आपल्या पत्नीसोबत नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता. यावेळी त्याच्या जेवणाचं बिल हे $78 म्हणजे 5600 रुपये इतकं झालं. मात्र त्यानंतर त्याने तेथील वेट्रेसला तब्बल $2020 रुपये टिप दिली.
थँक्यू बेथनी, हॅप्पी न्यू ईअर ! 2020 टिप चॅलेंज... डॉनीची पत्नी जेनी मॅकार्थीने बिलचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे. IHOP STORE नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ते जेवायला गेले होते.