Marathi News> मनोरंजन
Advertisement

Dream Girl 2 चा नवा टीझर प्रदर्शित, पूजाच्या आवाजनं रॉकीला केलं घायाळ, VIDEO व्हायरल

Dream Girl 2 : आयुष्मान खुरानानं 'ड्रिम गर्ल 2' चा टीझर केला शेअर. शाहरुख खानसोबत फ्लर्ट केल्यानंतर आता रणवीर सिंगसोबत करते फ्लर्ट... आयुष्मान खुरानानं शेअर केलेला हा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल... तर पूजानं अखेर सांगितली कधी भेटणार याची तारिख...

Dream Girl 2 चा नवा टीझर प्रदर्शित, पूजाच्या आवाजनं रॉकीला केलं घायाळ, VIDEO व्हायरल

Dream Girl 2 : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आयुष्मान खुरानाचे अनेक चित्रपट अशी केली आहेत ज्यातून समाजाल एक मेसेज देता येईल. त्यात अनेक चित्रपट आहेत. दरम्यान, आयुष्मान खुरानाचा एक चित्रपट आहे जो पाहून सगळ्यांना हसू अनावर होतं आणि तो चित्रपट म्हणजे ‘ड्रीम गर्ल’. ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं होतं. आता सगळ्यांची ड्रीम गर्ल म्हणजेच पूजा आता ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच चित्रपटाचा एक प्रोमो शेअर केला आहे. कदी ‘ड्रीम गर्ल’ नं शाहरुख खानच्या पठाणशी कोलॅबरेट केलं होतं तर आता त्यानं अभिनेता रणवीर सिंगच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासोबत कोलॅब केलं आहे. 

आयुष्मान खुरानानं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. याा व्हिडीओत आयुष्मान खुराना म्हणजेच पूजाही रॉकी म्हणजेच रणवीर सिंगची बोलताना दिसत आहे. त्या दोघांमध्ये झालेलं हा मजेशीर संवाद पाहून रॉकिंग रॉकी देखील पूजाला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'ड्रीम गर्ल 2' च्या व्हिडीओत पूजा रॉकीसोबत बोलताना तिच्या किलर स्टाईलमध्ये बोलताना दिसते. यावेळी पूजाचं कौतूक करत रॉकी बोलतो की लाल साडीत काय सुंदर दिसत आहेस, माझी राणी, प्रिये, यावर पूजा बोलते की, मी माझ्याकडे फक्त एकच आहे म्हणून मी नाही देणार. रॉकी म्हणतो साडी नको मला फक्त तू हवी आहेस. चार वर्षांनी वर्ल्ड कप कुठे येतोय? यावर पूजा हसत म्हणाली की तिला वर्ल्डकपबद्दल माहिती नाही, पण मी ट्रॉफी नक्कीच आहे. यानंतर रॉकी बोलतो की तू कधी येत आहेस. यावर पूजा म्हणते की आज पूजा जाहीर करते की पूजा हा सण आहे, यावेळी हा सण 25 तारखेला आहे.

हेही वाचा : आईला सुन आणण्याची घाई, विजय वर्मा म्हणतो 'अजून काहीच नाही'

पूजा आणि रॉकीचं संभाषण ऐकूण अनेकांना हसायसा आलं आहे. तर हा टीझर शेअर करत आयुष्माननं कॅप्शन दिलं की पूजा हा एक सण आहे. तुमच्यासाठी एक सर्प्राईज घेऊन यावेळी 25 जुलैला येणार आहे. तर 'ड्रीम गर्ल 2' 25 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आयुष्मानं दिलेलं हे कॅप्शन पाहून अनेकांनी असा अंदाज दर्शवला आहे की 25 जुलै रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read More