Marathi News> मनोरंजन
Advertisement

एकता कपूरला वयाच्या 22 व्या वर्षी करायचं होतं लग्न, पण....

तरीही सरोगसीच्या मदतीने 2019 मध्ये झाली आई

एकता कपूरला वयाच्या 22 व्या वर्षी करायचं होतं लग्न, पण....

मुंबई : टीव्ही क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor)चा आज 46 वर्षांची झाली. एकता कपूरने कायमच प्रेक्षकांच एकापेक्षा एक कलाकृतीने मनोरंजन केलंय. एकता आपल्या कामात एवढी मग्न झाली की, तिच्या लग्नाचा विचारही तिने डोक्यातून काढून टाकला. मात्र एक वेळ अशी देखील होती की, तिला लग्न करायचं होतं. आपला नवा संसार थाटायचा होता. मात्र पुढे असं काही झालं की तिने आपल्या इच्छांना मागे टाकलं.

लग्न करा अथवा कमवा 

एकताने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की,'जेव्हा मी 17 वर्षांची होती. तेव्हा माझे वडिल अभिनेता जितेंद्र यांनी सांगितलं की, एकतर लग्न कर अथवा पार्टी करण्यापेक्षा काम करा. जसं मला हवं. त्यांनी एकताला सांगितलं की, पॉकेटमनी व्यतिरिक्त ते काहीच देणार नाहीत. म्हणून पैसे कमविण्याकरता मी एका ऍड एजन्सीमध्ये काम केलं.'

22 वर्षांच्या असताना करायचं होतं लग्न 

एकताने एका मुलाखतीत सांगितलं की,'जी परिस्थिती होती ती बघून मला वाटायचं माझं जीवन चांगलं असेल. 22 वर्षांची असताना मी लग्न करेन आणिच आयुष्य खूप चांगल असेल. मात्र दुर्भाग्य असं की आपण जो विचार करतो ते होतंच असं नाही.' एकताने आतापर्यंत लग्न केलेलं नाही. मात्र 2019 मध्ये सरोगेसीच्या माध्यमातून आई झाली आहे. ज्याचं नाव रवी कपूर असं आहे. 

दोन लाख रुपये बुडाले 

एकता कपूरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की,'द फ्रेश प्रिसं ऑफ बेल एअर' या अमेरिकन टीव्ही शोच्या प्रेमाने तिला प्रेरित केलं. 'माझ्या डोक्यात सुरू असलेल्या कॉन्सेप्टच्या आधारावर पाच ते सहा पायलट्स बनवण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान एशिया टीव्ही झी टीव्हीला विकून टाकलं. या दरम्यान मी सॉफ्टवेअर विकण्याचा प्रयत्न केला. पण कुणीही घ्यायला तयार नाही. यामुळे माझे 2 लाख रुपये बुडाले.'

 

Read More