Marathi News> मनोरंजन
Advertisement

एकता कपूरचा लग्न न करण्यामागचा धक्कादायक खुलासा

कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

एकता कपूरचा लग्न न करण्यामागचा धक्कादायक खुलासा

मुंबई : जर एखाद्या व्यक्ती खूप वय झालं तरी लग्न नसेल केलं तर लोकं त्याच्याकडे यामागचं कारण विचारु लागतात. अनेकांना त्या व्यक्तीने लग्न का नसेल केलं असा प्रश्न पडतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी विवाह केलेला नाही. चाहत्यांना त्यांच्या लग्नाची खूप उत्सुकता असते. बॉलिवूडमध्ये आजही असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी विवाह केलेला नाही. सलमान खानबाबत तर नेहमीच चर्चा असते. पण आज आम्ही ज्या व्यक्ती बद्दल तुम्हाला सांगतोय ती व्यक्ती आहे एकता कपूर. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेक यशस्वी मालिका आणि सिनेमे करणार एकता कपूर अजूनही सिंगल का याबाबत तिनेच खुलासा केला आहे. 

एका कार्यक्रमात बोलतांना एकता कपूरने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं. तिने याबाबत खुलासा केल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. तिने म्हटलं की, वडिलांना सांगण्यावरुन तिने लग्न नाही केलं. एकता कपूर ही बॉलिवूडचे स्टार अभिनेते जितेंद्र यांची मुलगी आहे. एकताने म्हटलं की, 'वडिलांनी मला सांगितलं होतं की, एकतर काम करावं लागेल किंवा लग्न करावं लागेल. दोघं एकसोबत नाही होणार. त्यामुळे दोघांपैकी मी एकाला निवडलं.' एकता कपूर लहान वयापासूनच फिल्म मेकर बनण्याची स्वप्न बघत होती.

भारतीय टेलिव्हीजनमध्ये एकता कपूरचं खूप मोठं योगदान आहे. तिने अनेक यशस्वी मालिका केल्या आहेत. आजही तिच्या प्रोडक्शन कंपनीमध्ये 10 मालिका सुरु आहेत. याशिवाय सिनेमांमध्ये देखील एकताने यश मिळवलं आहे. आगामी काळात तिचे आणखी 5 सिनेमे येण्यासाठी तयार होत आहेत.

Read More