Marathi News> मनोरंजन
Advertisement

कास्टींग काऊच : एली अवरामकडे दिग्दर्शकाची अशी मागणी

चंदेरी दुनियाचं वास्तवदर्शी चित्र

कास्टींग काऊच : एली अवरामकडे दिग्दर्शकाची अशी मागणी

मुंबई : रंगीत, जगमगत्या, झगमगत्या दुनियेची ओढ प्रत्येकाला असते. अनेक मुली त्यांचे स्पप्न उराशी बाळगून या चंदेरी दुनियेत भविष्य घडवण्यासाठी येत असतात. पण त्यांच्या या मार्गावर अनेक काटे येतात. या ग्लॅमरच्या दुनियेत त्यांना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते. त्यात 'कास्टिंग काऊच'च्या काट्यानं कित्येक कलाकारांचं स्वप्न बहरण्याआधीच कोमजतं

तर काही कलाकार मोठ्या जिद्दीनं सर्व संघर्षांवर मात करत यशाचं शिखर गाठतात. टीव्ही अभिनेत्री एली अमराम देखील एकेकाळी कास्टिंग काऊचची शिकार झाली होती. बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या सोबत घडलेल्या प्रसंगांचा खुलासा केला. 

'मी मिटिंगसाठी गेली होती. तेथे दोन दिग्दर्शक उपस्थित होते. त्यांनी माझा हात जोरात दाबून ठेवला. त्यांना माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवायचे होते. त्यानंतर हा सर्व घडला प्रकार मी मित्राला सांगितला.'

अशाप्रकारे या चंदेरी जगातलं खरं वास्तव तिनं यावेळे समोर आणलं. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नोरा फतेहीने देखील तिचा अनुभव शेअर केला होता.  

Read More