Marathi News> मनोरंजन
Advertisement

40 वर्षांची आहेस आलियाच्या आईची भूमिका साकारशील? अंकिताच्या वयावरून खिल्ली उडवताच एल्विश यादव ट्रोल

Elvish Yadav Trolls over Age Shaming Ankita Lokhande : वयावरून अंकिता लोखंडेची खिल्ली उडवताच एल्विश यादव ट्रोलर्सच्या निशाण्यावर...

40 वर्षांची आहेस आलियाच्या आईची भूमिका साकारशील? अंकिताच्या वयावरून खिल्ली उडवताच एल्विश यादव ट्रोल

Elvish Yadav Trolls over Age Shaming Ankita Lokhande : छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयानं सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. अंकिता लोखंडेनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पवित्र रिश्ता या मालिकेत आधी तिनं पत्नी, मग सून आणि नंतर आईची भूमिका साकारली. दरम्यान, अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात एल्विश यादव हा अंकिताला आलिया भट्टच्या आईची भूमिका करशील असं बोलताना दिसतोय. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एल्विश यादवच्या पॉडकास्टमधील आहे. एल्विश यादवनं अंकिता लोखंडेला विचारलं की 'विकिपीडियावर तुझं वय हे 40 वर्ष दाखवत आहे. तर तू आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारशील? तर अंकितानं उत्तर दिलं की 40 वर्षांची महिला म्हातारी दिसते का? मी तुला इतकी मोठी दिसते.'

पुढे अंकिता म्हणाली, 'मी आधी पवित्र रिश्मामध्ये वयानं मोठ्या असलेल्या आईची भूमिका साकारली आहे. विकी जैन अंकिताचा नवरा म्हणाला, तिनं तिच्या वयाच्या 18 व्या वर्षी आईची भूमिका साकारली होती. मग एल्विशनं पुन्हा विचारलं, तू आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारशील का? अंकितानं उत्तर देत सांगितलं की, नाही मी आलिया भट्टची आई दिसत नाही. मुळीच नाही.'

अंकितावर केलेल्या या कमेंटनंतर एल्विशचा हा व्हिडीओ रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून त्याला चांगलेच ट्रोल करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'या अशिक्षितला कोणी तरी सांगा की आलिया भट्ट हे 32 वर्षांची आहे आणि तिच्या वयापेक्षा वयानं कमी असलेल्या भूमिका साकारत आहे. आलिया आणि अंकिता या दोघी त्यांच्या वयात फीट आणि सुंदर दिसतात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'एल्विश तू लूजरची भूमिका साकारशील? तू खूप मोठा लूजर आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'लोकं त्याच्या शोमध्ये का जातात?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हाच प्रश्न एका पुरुषाला विचारता येईल का?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'या अडाणी आणि छपरीला अशी संधी देतातच का?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'लाज वाटायला हवी, थोडी लाज आहे की नाही?'

हेही वाचा : घटस्फोटानंतर लोकप्रिय अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान, नातेवाई-मित्रांनी सोडली साथ; 12 वर्षांनंतर केलं कमबॅक

दरम्यान, अंकिता लोखंडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज मधून सुरुवात केली होती. त्यानंतर ती पवित्र रिश्ता या मालिकेत दिसली. या शोमध्ये तिनं 2009 ते 2014 पर्यंत काम केलं. या शोमध्ये अंकिताला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिनं झलक दिखला जा, कॉमेडी सर्कस सारख्या वेगळ्या शोमधून तिचं अभिनय कौशल्य दाखवलं. सध्या अंकिता ही 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये दिसत आहे. इथे ती तिचा नवरा विकी जैनसोबत आहे. 

Read More