Marathi News> मनोरंजन
Advertisement

हळव्या नात्याचा 'खिचिक'

नात्यांमध्ये गुरफटत गेलेल्या 'खिचिक' चित्रपटाची चर्चा सध्या चांगलीच रंगताना दिसत आहे.

हळव्या नात्याचा 'खिचिक'

मुंबई : नात्यांमध्ये गुरफटत गेलेल्या 'खिचिक' चित्रपटाची चर्चा सध्या चांगलीच रंगताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात आले आहे. नावातच वेगळेपण असलेल्या खिचिक या चित्रपटात हळव्या नात्याची गोष्ट पहायला मिळणार आहे. चित्रपटाची टीझर वरून 'खिचिक' चित्रपटाची कथा प्रेमी युगूलांच्या भोवती फिरत असताना दिसत आहे. 'मी चाललो तिच्याकडे, सय वाजवली गिटार आता' टीझर मधील हे वाक्य फार आकर्षक वाटत आहे  

कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडाला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रीतम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे.
 
अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते , शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे,  रसिका चव्हाण , यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला 'खिचिक' चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेत. गुरु ठाकूर आणि दत्ता लिखीत गीतांना अभिषेक-दत्ता यांचे संगीत लाभले आहे. 

Read More