Marathi News> मनोरंजन
Advertisement

लॉन्जरी शोमध्ये दिसला ईशा गुप्ताचा सेक्सी अवतार, व्हिडीओ व्हायरल

ईशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

लॉन्जरी शोमध्ये दिसला ईशा गुप्ताचा सेक्सी अवतार, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ईशा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. ईषा नेहमीच तिच्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. ईशा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, ईशाचा नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
काल म्हणजेच शुक्रवारी ईशा गुप्तानं मुंबईत एका लॉन्जरी शोसाठी रॅम्प वॉक केला. ईशने रॅम्प वॉकसाठी सॉटन ब्लॅक स्लिट ड्रेस परिधान केला होता. रॅम्प वॉक करताना ईशा सुंदर दिसत होती यात शंका नाही. या डीप नेक सॉटनच्या ड्रेसमध्ये ईशाचे सौंदर्य खुलून दिसत होते. तिची परफेक्ट फिगर ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. रॅप वॉक दरम्यान ईशाच्या स्टाईलनं सर्वांना वेड लावलं. सोशल मीडियावर ईशाचं चाहते तिच्या या नव्या लूकचे कौतुक करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ईशा गुप्ताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे खूप वाद झाला होता. ईशाच्या वर्कआउट व्हिडिओमध्ये अभिनेत्रीनं बॅकग्राउंडमध्ये भगवान शिवाचं भजन लावलं होतं. यानंतर ईशाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. ईशा गुप्ता एक फिटनेस फ्रीक आहे जी तिच्या आरोग्याकडे खूप लक्ष देते. अनेकदा ईशाच्या वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अखेरची बॉबी देओलसोबत 'आश्रम 3' या वेब सीरिजमध्ये 'सोनिया'च्या भूमिकेत दिसली होती.

Read More