Marathi News> मनोरंजन
Advertisement

पहिला चित्रपट सुपरहिट देऊनही 'या' 5 अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये मिळालं नाही काम

अभिनयक्षेत्र हे असं क्षेत्र आहे, जिथे अनेक लोक आपलं नशीब बदलायला येतात. परंतु...

पहिला चित्रपट सुपरहिट देऊनही 'या' 5 अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये मिळालं नाही काम

मुंबई : अभिनयक्षेत्र हे असं क्षेत्र आहे, जिथे अनेक लोक आपलं नशीब बदलायला येतात. परंतु प्रत्येकाला येथे संधी मिळतेच असं नाही. परंतु ज्यांना संधी मिळते ते आपलं नशीब पूर्णपणे बदलून टाकतात. परंतु तरी देखील असे काही लोक आहेत, ज्यांना संधी मिळून देखील त्यांना आपल्या अभिनयाची जादू चालवता आली नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांना बॉलिवूडमध्ये आपलं अभिनय आणि कला दाखवण्याची संधी मिळाली, एवढंच काय तर मोठ-मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. परंतु त्यांना या संधीचा पूरेपूर फायदा घेता आलेला नाही. ज्यामुळे चित्रपट हीट ठरला तरी, देखील त्यांना इंडस्ट्रीत पुन्हा काम मिळालं नाही. ज्यामुळे त्यांचं करिअर संपलं

सोनल चौहान

fallbacks

2008 मध्ये अभिनेत्री सोनल चौहानने इमरान हाश्मीसोबत 'जन्नत' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमाई केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली, एवढेच काय तर या चित्रपटातील गाणी देखील हीट ठरली, पण त्यानंतरही सोनलला फारसे यश मिळाले नाही. आता सोनल चित्रपटांमध्ये नाही, तर फक्त सोशल मीडियावर दिसत आहे.

ईशा गुप्ता

fallbacks

या यादीत ईशा गुप्ताच्या नावाचाही समावेश आहे. तिने सीरियल किसर इमरान हाश्मीसोबत 'जन्नत 2' चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटालाही चांगलीच पसंती मिळाली होती. ईशाने 2007 मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता. आता ईशा वेब सीरिजमध्ये दिसते, खरी पण तिला पाहिजे, तसे यश मिळाले नाही.

शमिता शेट्टी

fallbacks

या यादीत प्रसिद्ध अभिनेत्रीची शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीचाही समावेश आहे. शमिताने 2000 साली शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत 'मोहब्बतें' चित्रपटातून पदार्पण केले. मात्र या चित्रपटाशिवाय तिने पुढील एकाही चित्रपटात प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत.

प्रीती झांगियानी

fallbacks

अभिनेत्री प्रीती झांगियानीने शमिता शेट्टीप्रमाणेच 'मोहब्बतें' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिची भूमिकाही लोकांना फार आवडली. मात्र असे असूनही प्रीतीच्या कारकिर्दीला वेग आला नाही. 2008 मध्ये अभिनेता आणि मॉडेल परवीन दाबाससोबत लग्न करून फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केलं.

स्नेहा उल्लाल

fallbacks

ऐश्वर्या रायची डुप्लिकेट म्हणून ओळखली जाणारी स्नेहा उल्लाला 2005 साली बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. तिने सलमान खान सोबत 'लकी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्यानंतरही तिला बॉलिवूडमध्ये विशेष काम मिळाले नाही.

मात्र, ती सोहेल खानसोबत 'आर्यन'मध्येही दिसली होती. पण याचाही तिच्या करिअरला फारसा फायदा झालेला नाही. यानंतर स्नेहाने बॉलिवूडपासून दुर राहण्याचा निर्णय घेतला.

Read More