Marathi News> मनोरंजन
Advertisement

शमिताला Girlfriend म्हणताना का अडखळला राकेश? हे ब्रेकअप नाही तर आणखी काय?

अनेक दिवस एकत्र घालवल्यानंतर तिला गर्लफ्रेंड म्हणायला का अडखळला राकेश? अखेर सत्य समोर...   

शमिताला Girlfriend म्हणताना का अडखळला राकेश? हे ब्रेकअप नाही तर आणखी काय?

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी' शो दरम्यान प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी अभिनेत्री शमिता शेट्टी आणि आभिनेता राकेश बापट एकमेकांच्या जवळ आले असल्याची चर्चा होती. पण आता शो संपल्यानंतरही दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं अनेकदा समोर आलं. मध्यंतरी दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या देखील तुफान रंगल्या. पण त्यावर देखील पूर्ण विराम लावण्यात आला. पण आता पुन्हा शमिता आणि राकेशचं नातं चर्चेत आलं आहे. यावेळी राकेशने त्यांच्या नात्याला नाव दिलं नाही. 

एका मुलाखतीत राकेश शमिताला गर्लफेंड म्हणण्यासाठी थोडा अडखळला. यावेळी राकेशने शमिताला चांगली मैत्रीण म्हणून संबोधलं. तो म्हणाला, 'आमच्या दोघांमध्ये मैत्रीचं फार घट्ट नातं आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा परिणाम माझ्यावर होत नाही...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तो पुढे म्हणाला, 'मला या नात्याला नाव द्यायचं नाही. जर तुम्ही तुमच्या नात्याला नाव देत असाल, तर फक्त फेम गेम आहे... त्यामुळे शमिता आणि माझ्यात असेलं नातं आम्हाला माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे मी तिचा आदर करतो...'

दररम्यान शमिताने राकेशसोबत लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. पण त्यानंतर ब्रेकअपच्या चर्चा आणि नात्यात आलेल्या दुराव्यामुळे राकेश आणि शमिता पुन्हा एकत्र येतील नाही... हे काळचं ठरवेल.

Read More