Marathi News> मनोरंजन
Advertisement

EXCLUSIVE : 'शनाया' परत येतेय....

पुन्हा एकदा शनायाची जादू अनुभवता येणार 

EXCLUSIVE : 'शनाया' परत येतेय....

दक्षता ठसाळे, घोसाळकर, झी मीडिया, मुंबई : झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ही प्रेक्षकांची सर्वात पसंतीची मालिका. ही मालिका आता लॉकडाऊननंतर नव्या, फ्रेश एपिसोडसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासोबत प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज असणार आहे. हे सरप्राईज म्हणजे मालिकेतील लोकप्रिय व्यक्तीरेखा 'शनाया'. 

राधिका, गुरूनाथ आणि शनाया यांच्याभोवती ही मालिका फिरते. या मालिकेतील शनायाची भूमिका साकारणातील अभिनेत्री रसिका सुनिल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रसिका सुनिल पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक करत आहे. (EXCLUSIVE : कार्तिकी गायकवाडचा २६ जुलैला साखरपुडा)

मालिकेच्या सुरूवातीला रसिका सुनील 'शनाया'ची भूमिका साकारत होती. रसिकाने 'शनाया' अगदी घरोघरी पोहोचवली. मधल्या काही काळात रसिका आपल्या शिक्षणाकरता परदेशात गेली असता ही भूमिका अभिनेत्री ईशा केसकर साकारत होती. पण ईशा केसकरची तब्बेत बिघडली असल्यामुळे तिला मालिकेचं शुटिंग करणं शक्य होणार नव्हतं. तिच्या या खासगी कारणामुळे आता ती मालिकेत दिसणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रसिका सुनील 'शनाया'च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकांच चित्रीकरण थांबल होतं. आता काही नियम-अटींनुसार मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.  'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचं नवं कोरं, फ्रेश असं शुटिंग सुरू झालं आहे. फ्रेश एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रसिका सुनिलचं कमबॅक हे देखील प्रेक्षकांना गोड सरप्राईज मिळणार आहे. 

मालिकेचं शुटिंग नव्या ठिकाणी 

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचं शुटिंग आता नवीन ठिकाणी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकांच्या शुटिंगला परवानगी मिळाली खरी पण अनेक नियमांच पालन करावं लागणार आहे. अशातच मालिकेचं शुटिंग हे एका कॉम्प्लेक्समध्ये होत होतं. तेथे सोशल डिस्टन्शिंगचा प्रश्न होता. म्हणून आता मालिकेचं शुटिंग हे इगतपुरी येथे करण्यात येत आहे. 

Read More