Marathi News> मनोरंजन
Advertisement

कपिल शर्मा पत्नीसोबत 'बेबीमून' व्हॅकेशनला; फोटो व्हायरल

कपिल डिसेंबर २०१८ मध्ये गिन्नी चतरथसोबत विवाहबंधनात अडकला.

कपिल शर्मा पत्नीसोबत 'बेबीमून' व्हॅकेशनला; फोटो व्हायरल

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माने छोट्या पडद्यावर 'द शर्मा शो'मधून पुनरागमन केलं. 'द शर्मा शो'ला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असून टीआरपीमध्येही हा शो वरच्या क्रमांकावर आहे. मात्र अशातच आता कपिल शर्मा अचानक सुट्ट्यांवर गेला आहे.

कपिल त्याची लॉग्नटाइम प्रेयसी गिन्नी चतरथसोबत डिसेंबर २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकला. आता दोघेही आई-बाबा होणार आहेत. ही गुडन्यूज सेलिब्रेट करण्यासाठी कपिल आणि गन्नी दोघेही बेबीमूनसाठी कॅनडाला रवाना झाले आहेत. 

बुधवारी रात्री उशिरा दोघांनाही मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं. सोशल मीडियावर कपिल आणि गन्नीचे विमानतळावरील फोटो व्हायरल होत आहेत. 

'मी सध्या माझ्या पत्नीची काळजी घेऊ इच्छितो. येणाऱ्या बाळसाठी संपूर्ण कुटुंबच उत्साही आहे. आम्ही केवळ गिन्नी आणि बाळाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत असल्याचं' कपिलने म्हटलंय. 

सेलिब्रिटी कपलमध्ये सध्या बेबीमून वॅकेशनचा नवा ट्रेंडच आला आहे. कपिल आणि गिन्नीआधी नेहा धूपिया-अंगद, एमी जॅक्सननेही बेबीमून वॅकेशन सेलिब्रेट केलं होतं.

कपिल शर्मा हॉलिवूड चित्रपट 'अॅग्री बर्ड'चा भाग बनला आहे. हॉलिवूडचा सुपरहिट अॅनिमेटेड चित्रपट 'अॅंग्री बर्ड २' मधील प्रमुख भूमिका असणाऱ्या 'रेड' या पात्रासाठी कपिल आवाज देणार आहे. 'अॅंग्री बर्ड २' हिंदीव्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २३ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Read More