Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमिर खानला बदनाम करण्यामागे नेमकं आहे तरी कोण?

2021 मधील बॉलिवूडमधील सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणजे आमिर खानचा दुसरा घटस्फोट. 

आमिर खानला बदनाम करण्यामागे नेमकं आहे तरी कोण?

मुंबई : 2021 मधील बॉलिवूडमधील सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणजे आमिर खानचा दुसरा घटस्फोट. किरण रावपासून घटस्फोटाच्या बातमीनंतर आमिरच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत. फोटो व्हायरल होण्या मागचं कारण म्हणजे हे आमिर खानच्या तिसर्‍या लग्नाचे फोटो सांगितलं जात आहेत. ज्यामध्ये आमिर वर आणि फातिमा सना शेख वधूच्या वेशात दिसत आहेत. जाणून घेऊया या बातमीमागचं सत्य 

आमिर आणि फातिमाचं लग्न!
आमिर खानने 'दंगल' गर्ल फातिमा सना शेखसोबत तिसऱ्यांदा लग्न केल्याचा दावा आता सोशल मीडियावर काही फोटोंद्वारे केला जात आहे. या फोटोंसह, काही युजर्स असंही म्हणत आहेत की, आमिर खान त्याचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट लाल सिंग चड्ढा प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या लग्नाची घोषणा करेल.

अमिरला बदमान करणार नेमकं आहे तरी कोण?
अमिर खान आणि फातिमाचे हे फोटो खरे नसून फोटोशॉप केलेले आहेत. हे पूर्णपणे खोटे फोटो आहेत. हे फोटो कोणी एडिट केले हे अद्याप समोर आलेलं नाही. पण हे फोटो खोटे असून प्रत्येक आठवड्याला त्यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत असतात. याचबरोबर फातिमा शेखचं नाव अमिरसोबत वारंवार जोडलं जातं. पण असं नेमकं का होतं आणि कोण करतं हे अद्याप समजलेलं नाही. यामुळे अमिर आणि फातिमा नेहमी बदनाम होतात. 

फोटोनंतर फातिमा ट्रोल 
एका फेसबुक पोस्टनंतर फोटो आणि ही बातमी व्हायरल व्हायला सुरु झाली. ज्यामध्ये, सांगितलं जात आहे की, आमिर आणि फातिमाने लग्न केलं आहे. जेव्हापासून किरण राव आणि आमिरचा घटस्फोट झाला आहे. तेव्हा पासून फातिमा युजर्सच्या निशाण्यावर आहे. 

fallbacks

व्हायरल फोटोमागचं सत्य
आमिर आणि फातिमाचा हा फोटो खरा नसून खोटा आहे. जर तुम्ही लक्षपुर्वक हा फोटो पाहिलात तर तुम्हाला लगेच कळेल की, हा फोटो खोटा आहे. हा खरा फोटो अमृता राव आणि आमिर खानचा आहे. ज्या फोटोचं एडिटींग केलेलं आहे. हा फोटो फोटोशॉप केल्याचं समोर येत आहे.

fallbacks

Read More