Marathi News> मनोरंजन
Advertisement

Fact Check : Aishwarya Rai अडकली मोठ्या वादात, 29 वर्षाय मुलाने केलेल्या वक्तव्यामागे काय आहे सत्य?

बॉलिवूडचे सिलिब्रिटी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या सिलिब्रिटींच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते.

Fact Check : Aishwarya Rai अडकली मोठ्या वादात, 29 वर्षाय मुलाने केलेल्या वक्तव्यामागे काय आहे सत्य?

मुंबई : बॉलिवूडचे सिलिब्रिटी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या सिलिब्रिटींच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असते. ते काय करतात? कुठे आणि कोणासोबत असतात? याची देखील चाहाते माहिती ठेवतात. आता ऐश्वर्या राय बच्चन देखील तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. ऐश्वर्या राय एका 29 वर्षीय मुलाच्या वक्तव्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या आंध्रप्रदेशमधील मुलाचं म्हणणं आहे की, ऐश्वर्या राय ही त्याची आई आहे.

या मुलाचे नाव संगीत कुमार आहे आणि त्याने सगळ्यांना हे सांगायला सुरूवात केली आहे की, ऐश्वर्याने त्याला 1988 मध्ये IVF च्या माध्यमातून लंडनला जन्म दिला होता. यानंतर संगीत आपले आजी बिंद्रा कृष्णराज रायसोबत राहत होता. त्याच्या मामाचे नाव आदित्य राय आहे.

त्याने हे देखील सांगितले की, ऐश्वर्या त्याची आई आहे. हे सांगण्यासाठी त्याच्याकडे कोणताही पूरावा नाही. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी देखील त्याला बऱ्याचदा रोखून धरलं आणि त्याच्या मनात असं काही भरलं, ज्यामुळे इतकी वर्ष तो गप्प बसला. परंतु आता त्याला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, ज्युमुळे तो आता सर्वांसमोर आला आहे.

संगीतने सांगितले की , वयाच्या 3 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत तो चोडावरममध्ये वाढला आहे.

fallbacks

आता या संगीतचं म्हणणं आहे की, मी इतकी वर्ष माझ्या आईच्या प्रेमापासून लांब होतो. परंतु आता जेव्हा मला माझ्या आईबद्दल कळलं आहे, तर मला आता तिच्यासोबतच राहायचं आहे.

परंतु हा संगीत कुमार ज्या वेळेची गोष्ट सांगत आहे, त्यावेळी ऐश्वर्या फक्त 14 वर्षांची होती, त्यामुळे ऐश्वर्या या संगीतची आई असल्याची शक्यता फारच नगण्य आहे. त्यामुळे हा फक्त एक पब्लिसिटी स्टंट आहे.

Read More