Marathi News> मनोरंजन
Advertisement

Fake News Alert: सुशांत - आलियाच्या 'त्या' फोटोचा 'झी न्यूज'सोबत संबंध काय?

'झी न्यूज'च्या नावावर का व्हायरल होत आहे सुशांत आणि आलियाचा 'तो' फोटो, नक्की काय आहे संबंध?  

Fake News Alert: सुशांत - आलियाच्या 'त्या' फोटोचा 'झी न्यूज'सोबत संबंध काय?

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरचं दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं. तेव्हा देखील हे कपल लग्नाच्या फोटोंमुळे चर्चेत आलं, पण आता आलियाच्या होणाऱ्या बाळाचा संबंध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत जोडला जात असल्याचं कळत आहे. काही खोडकर वृत्तीच्या लोकांनी आलियाच्या होणाऱ्या बाळाचा संबंध थेट सुशांतच्या पुनर्जन्माशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर येत आहे. 

सोशल मीडियावर एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुशांतचा आलिया भट्टच्या मुलाच्या रूपात पुनर्जन्म होणार असल्याचं लिहिल आहे. एवढंच नाही फोटो एडीट करुन त्यावर 'झी न्यूज'चा लोगो देखील लावला आहे. 

व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटशी 'झी न्यूज'चा काहीही संबंध नाही. झी न्यूजने असा कोणताही कार्यक्रम चालवला नाही किंवा बातमी प्रसिद्ध केली नाही. हा पूर्णपणे बनावट स्क्रीनशॉट आहे, जो चुकीच्या उद्देशाने फोटोशॉपच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

'झी न्यूज'च्या ज्या शोचा बनावट स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे तो पूर्वीच बंद झाला आहे. स्क्रीनशॉट पुर्णपणे फेक असून खोडकर घटकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. झी न्यूजचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे वाचकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका. 

 

 

 

 

Read More