Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून कायम शांत असणाऱ्या मनोज बाजपेयीचा पारा चढला; उचललं मोठं पाऊल

या प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळणार? 

...म्हणून कायम शांत असणाऱ्या मनोज बाजपेयीचा पारा चढला; उचललं मोठं पाऊल

मुंबई : कायमच आपल्या शांत स्वभावासाठी आणि दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता मनोज बाजपेयी यानं एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिशय मोठं पाऊल उचलत त्यानं स्वघोषित चित्रपट समीक्षक, केआरके अर्थात कमाल आर खान, याच्याविरोधात अब्रूनुकसानीचा आरोप करत एक तक्रार दाखल कोली आहे. 

वृत्तसंस्थेशी संवाद साधताना इंदूर न्यायालात यासंदर्भातील याचिका दाखल केल्याची माहिती बाजपेयीच्या वकिलांनी दिली. judicial magistrate first class (JMFC) न्य़ायालयात त्यानं भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 500 अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. 

बाजपेयीच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये त्याच्याकडून सदर प्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा ठोकणाऱ्या याचिकेची नोंद करण्यासंदर्भातील मागणी केली आहे. 

कमाल आर खान यानं 26 जुलै रोजी केलेल्या एका ट्विटमुळं मनोज बाजपेयी यांच्या समाजातील आणि चाहत्यांच्या मनातील प्रतिमेला धक्का लागला असल्याचं त्याच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे. ज्यामध्ये मनोजविषयी आक्षेपार्ह सब्दांचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, मनोज बाजपेयीनं या प्रकरणी खुद्द न्यायालयापुढे हजर राहत आपला जबाब नोंदवला. आता या प्रकरणी न्यायालयाकडून कोणता निर्णय दिला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

केआरकेविरोधात आवाज उठवणाऱ्या मनोज बाजपेयी यानं कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या हा अभिनेता येत्या काळात  The Family Man season 3, कुरुप आणि डिस्पॅच या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read More