Marathi News> मनोरंजन
Advertisement

विकेंडला दुसऱ्या मुलीसोबत रात्र घालवायचा, बिल पाहून प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने त्याला रंगेहाथ पकडलं अन् मग...

TV Actor Extra Marital Affair : हा प्रसिद्ध अभिनेता विकेंड कायम पत्नीला सोडून एका तरुणीसोबत हॉटेलमध्ये घालवत होता. रंगेहाथ पडकल्यानंतर पत्नीला त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली.     

विकेंडला दुसऱ्या मुलीसोबत रात्र घालवायचा, बिल पाहून प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने त्याला रंगेहाथ पकडलं अन् मग...

TV Actor Extra Marital Affair बॉलिवूडमध्ये विवाहबाह्य संबंध हे काही नवलं नाहीत. बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत असे अनेक कलाकारांबद्दल तुम्हाला विवाहबाह्य संबंधांबद्दल किस्से ऐकायला मिळतील. आज आपण अशाच एका प्रसिद्ध टीव्ही इंडस्ट्रीमधील अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. जो लग्नानंतरही त्याचे प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीशी विवाहबाह्य संबंध होते. या अभिनेत्याचे अफेयर पत्नीने रंगेहाथ पडकले होते. आम्ही बोलत आहोत, क्राइम पेट्रोल होस्ट आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अनुप सोनीबद्दल. 

अनुप कलर्स टीव्ही शो 'बालिका वधू' चाही भाग होता. तर 'क्राइम पेट्रोल'च्या सूत्रसंचालक म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तो 5 वर्षांपूर्वी शो सोडून गेला होता आणि आता तो होस्ट म्हणून परतला आला आहे. अनेकांना माहिती नाही, पण अनुप सोनी हा ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते राज बब्बर यांचा जावई आहे. त्यांनी त्यांची मुलगी जुही बब्बर हिच्याशी दुसरं लग्न केलं आहे. यापूर्वी अनुपचं लग्न एका व्यावसायिका रितूशी झाले होते. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर, रितूला अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांची कल्पना मिळाली आणि दोघांनी घटस्फोट घेतला. विवाहित असूनही अनुप सोनी ज्या मुलीशी रिलेशनशिपमध्ये होते ती दुसरी तिसरी कोणी नसून जुही बब्बर होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anup Soni (@anupsoni3)

स्वतः अभिनेत्याने वीकेंड एकत्र घालवल्याचे केलं कबूल

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रितू म्हणाली की एके दिवशी अनुप तिच्याकडे आला आणि म्हणाला की, आता तो त्यांच्या मुलांची जबाबदारी घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत, रितूने अनुपच्या मोबाईल बिलाची संपूर्ण माहिती मागितली आणि त्यानंतर अभिनेत्याचे सर्व गुपित उघड झाले.

अनुपच्या मोबाईल बिलात स्पष्टपणे दिसून आलं की अभिनेता दिवसभर बहुतेक वेळ जुहीसोबत फोनवर बोलत होता, त्यामुळे रितूचा संशय निश्चित झाला. मात्र, नंतर अनुपने रितूला कबूल केले की तो जुहीसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्यांनी अनेक वीकेंड एकत्र घालवले होते. 

Read More